ठाणे परिवहनचे 352.81 कोटी रुपयांचे मूळ अंदाज पत्रक सादर, कोणतीही भाडेवाड नाही

By ऑनलाइन लोकमत | Published: February 15, 2018 12:54 PM2018-02-15T12:54:43+5:302018-02-15T12:55:45+5:30

ठाणे परिवहन सेवेचं सण 2017- 18 चे सुधारित व  2018- 19 चे मूळ अंदाज पत्रक सादर करण्यात आले. मागील वर्षी २६८ कोटी २२ लाख रुपयांचा अंदाज पत्रक होते.

Thane Transport has submitted the Rs 352.81 croresestimate sheet | ठाणे परिवहनचे 352.81 कोटी रुपयांचे मूळ अंदाज पत्रक सादर, कोणतीही भाडेवाड नाही

ठाणे परिवहनचे 352.81 कोटी रुपयांचे मूळ अंदाज पत्रक सादर, कोणतीही भाडेवाड नाही

Next

ठाणे - ठाणे परिवहन सेवेचं सण 2017- 18 चे सुधारित व  2018- 19 चे मूळ अंदाज पत्रक सादर करण्यात आले. मागील वर्षी २६८ कोटी २२ लाख रुपयांचा अंदाज पत्रक होते. यंदा हेच अंदाज पत्रक 352 कोटी 81लाख रुपयांच्या घरात गेले आहे. यंदा कोणत्याही प्रकारची भाडे वाढ न करता परिवहन जाहिराती तसेच आगारांच्या विकासाच्या माध्यमातून परिवहन सेवेचं उत्पन्न वाढवण्याचा परिवहन सेवेने निर्णय घेतला आहे. तर बायो-इथेनॉलवर चालणाऱ्या 100, तेजस्विनी 50, ई तिकीट, वेबसाइट, दिव्याग्यांना प्रवासात सवलत, जेस्ट नागरिकांना सवलत आदी काही नव्या सुविधा देण्यात येणार आहेत.

ठाणे परिवहन सेवेचा २०१८-१९ चा अर्थसंकल्प प्रभारी व्यवस्थापक संदीप माळवी यांनी गुरुवारी हे अंदाज पत्रक परिवहन समितीला सादर केले. यंदाच्या अर्थसंकल्पात ठाणे परिवहन सेवेकडून ठाणेकर प्रवाशांना खूप अपेक्षा होत्या पण भाडेवाढ न करुन परिवहनने प्रवाशांना काहीसा दिलासा दिला आहे.  मागील काही महिन्यांपासून ठाणे परिवहन सेवा कात टाकत आहे काही महत्त्वपूर्ण सुधारणा परिवहन सेवेत झाली आहे महत्त्वाचे म्हणजे ठाणे परिवहन सेवेच्या उत्पन्नात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे.  सध्या ठाणे ते बोरीवली या मार्गावरील वातानुकुलीत बससेवेला चांगला प्रतिसाद मिळत आहे या बसच दिवसाचं उत्पन्न सरासरी दीड लाख रुपयांच्या आसपास आहे. या मार्गावर १८ वातानुकुलीत बसेस धावतात त्याव्यतिरिक्त साध्य बसेसही ठाणे ते बोरीवली दरम्यान जातात तसेच ठाणे ते भिवंडी ठाणे ते  नालासोपारा या नव्याने सुरू करण्यात आलेल्या मार्गावरील बससेवेलाही चांगला प्रतिसाद मिळत आहे.

याच प्रमाणे मीरारोडला जाणाऱ्या बसमध्ये प्रवाश्यांची गर्दी अधिक असते तर ठाणे शहरात अंतर्गत लोकमान्य नगर नितीन कंपनी मार्गे ठाणे स्टेशनला जाणाऱ्या बसलाही प्रवाशांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. परिणामी परिवहनसेवेच्या उत्पन्नातही मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे सध्या ठाणे परिवहन सेवेचं उत्पन्न हे दिवसाला २९ लाख ६६ हजार रुपये इतके आहे. याचा विचार करता आता दर महिन्याला ठाणे परिवहन सेवेचं सरासरी उत्पन्न साडे सात कोटी इतक होत आहे. तर दुसरीकडे  ठाणे शहराची लोकसंख्या पाहता  त्या तुलेनत मात्र  बसगाड्यांची संख्या फारच कमी आहे. ठाणे शहरातील अंतर्गत मार्ग, शहराबाहेर जाणारे डोंबिवली, वाशी, पनवेल, भाईंदर, मीरारोड, बोरिवली असे टीएमटीचे एकूण१०१  मार्ग आहेत. या मार्गांची लांबी १९८ किमी आहे. दिवसाला 1लाख ,६८हजार ९५ प्रवासी टीएमटीच्या बससेवेमधून प्रवास करतात. विशेष म्हणजे यंदादेखील ठाणे पालिकेकडून तबल 227.73 कोटी रुपये अनुदानची अपेक्षा या केली आली.

Web Title: Thane Transport has submitted the Rs 352.81 croresestimate sheet

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :thaneठाणे