ठाण्यात सख्या व मावस बहिणीला देहविक्रीच्या ओढणाºया महिलेस अटक; त्या दोघींची सुटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2018 08:16 PM2018-02-10T20:16:35+5:302018-02-10T20:23:01+5:30
ठाणे : मोबाईलद्वारे देहविक्रीचे हॉयप्रोपाईल रॅकेट चालविणा-या मीरारोड येथील पुजा नामक (२६) महिलेचा ठाणे शहर पोलिसांनी पदार्फाश करून तिच्या सख्या आणि अल्पवयीन मावस बहिणीची या व्यवसायातून सुटका केली आहे. ही कारवाई शुक्रवारी रात्री ठाण्यातील वागळे इस्टेट परिसरात केल्याची माहिती पोलिसांनी दिली.
मीरारोड परिसरात राहणारी २६ वर्षीय महिला मोबाईल फोनद्वारे हॉयप्रोपाईल रॅकेट चालवत असल्याची माहिती ठाणे गुन्हे शाखा अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र दौंडकर यांनी मिळाली होती. त्यानुसार, तिच्याशी संपर्क साधून शरीर संबंधासाठी महिलेची मागणी करण्यात आली. तसेच, तिने वागळे इस्टेट येथील द्वारका हॉटेलमध्ये सख्या आणि मावस बहिण अशा दोघींना आणल्यावर पैसे घेताना तिला रंगेहात पकडले. पुजा हिच्या विरोधात वागळे इस्टेट पोलीस ठाण्यात बालक लैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियम आणि पिटा अॅक्टनुसार गुन्हा दाखल करून तिला शुक्रवारी रात्री अटक केली. तसेच त्या दोघींची पोलिसांनी सुटका केली. शनिवारी पुजाला ठाणे न्यायालयाने १५ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. तर, त्या दोघींची रवानगी उल्हासनगर येथील सुधारगृहात क रण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.
पुजाही या साठी ५० हजार घेत असे. त्यातील दहा हजार रुपये ती तिच्या सख्या बहिणीला तर १५०० रुपये मावस बहिणी देऊल उर्वरित पैशांवर उपजिवीका करीत असे. पुजाची बहिणही यंदा बारावीला असून ती प्रॅक्टीसची परीक्षा देऊन आली होती. तसेच तिने मावस बहिणीला आपले मुल सांभाळण्यासाठी सहा महिन्यांपूर्वी गावावरून आणले होते. त्यानंतर तिलाही तिने या व्यवसायात ओढून अवघे १ हजार ५०० रुपये देत होती. तसेच पुजा मागील एक वर्षापासून हा व्यवसाय चालवित असल्याची माहिती पोलिसांनी दिली. याप्रकरणी वागळे इस्टेट पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रविकांत मालेकर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.