ठाणेकरांना दुबिर्णीतून आकाश पाहण्याची मिळणार संधी, ठाण्यात आगळा वेगळा शैक्षणिक उपक्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2018 04:54 PM2018-04-25T16:54:28+5:302018-04-25T17:41:41+5:30
ठाणेकरांसाठी अॅमॅच्युअर अॅस्ट्रॉनॉमी क्लब यांच्या सहकार्याने दुर्बिणीतून आकाश दर्शन शैक्षणिक कार्यक्र म येत्या शनिवारी आयोजित केला आहे.
ठाणे : लहानांपासून ज्येष्ठांपर्यंत सर्वांनाच आकाशाचे दर्शन पाहण्याची संधी मिळणार आहे. शनिवार २८ एप्रिल रोजी सायं. ७.३० वा. गोदुताई ताई परु ळेकर उद्यान, चांदीवाला कॉम्प्लेक्स समोर, चंदन वाडी, ठाणे (प) येथे हा उपक्रम राबविला जाणार असल्याची माहिती आयोजक राजेश मोरे यांनी दिली.
अॅमॅच्युअर अॅस्ट्रॉनॉमी क्लब यांच्या सहकार्याने दुर्बिणीतून आकाश दर्शन शैक्षणिक कार्यक्र म होत आहे. लोकांमध्ये खगोलशास्त्राविषयी जागृती व्हावी, ज्योतिषशास्त्रापेक्षा विज्ञानावर विश्वास असावा, अंधश्रद्धेपासून दूर जाऊन दुबिर्णीतून दिसणाऱ्या गोष्टी खºया असतात हे त्यांना पटवून द्यावे या उद्देशाने हा उपक्रम आयोजित केला असल्याचे क्लबचे संस्थापक सदस्य उमेश घुडे याने सांगितले. या कार्यक्र मात ाुरु ,चंद्र हे ग्रह दुर्बिणीतून पाहण्याची संधी उपलब्ध होणार आहे तसेच सूर्यमाले बद्दल माहितीपट दाखवण्यात येणार आहे, अंतराळाबदल माहिती देण्यात येणार आहे. उपस्थितांना प्रोजेक्टरवर व्याख्यान दिले जाणार आहे. सुर्यमालेतील ग्रह आणि त्या आठ ग्रहांबद्दल माहिती दिली जाणार आहे. सुर्यमालेव्यतिरिक्त आपल्या अवकाशात असलेले तारका समुह, दिर्घीका, सुर्याव्यतिरिक्त असलेले मोठे तारे, विश्वाची निमिर्ती कशी जाली, विश्व किती मोठे आहे याची इत्यंभूत माहिती या उपक्रमात दिली जाणार आहे असे उमेशने सांगितले. पाठ्यपुस्तकात शिकत असलेले विज्ञान हे प्रत्यक्षात देखील शिकले जावे असे उमेशचे म्हणणे आहे. यात क्लबचे सदस्य उमेश घुडे, सलील घारपुरे , अमोल कुलकर्णी व अमित पाटणकर हे मार्गदर्शन करणार आहे. गेल्या चार वर्षांपुर्वी या क्लबची स्थापना झाली. तेव्हापासून छोटे छोटे कार्यक्रम आयोजित केले जातात. पहिल्यांदा ठाण्यात मोठ्या प्रमाणात कार्यक्रम होत आहे. विशेष म्हणजे या उपक्रमात दुबिर्णीतून चंद्र व गुरू दाखविले जाणार आहे. या कार्यक्र मात सहभागी होण्यासाठी नाव नोंदणी आवश्यक आहे. अधिक माहितीसाठी संपर्क : राजेश मोरे जनसंपर्क कार्यालय ए-१/००२, दांडेकर दत्त छाया सोसायटी, संत ज्ञानेश्वर मार्ग, पांचपाखाडी, ठाणे (प).