राष्टÑीय बेंचप्रेस स्पर्धेत ठाण्याच्या संजय दाभोळकर यांना सुवर्णपदक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2018 06:33 PM2018-01-23T18:33:20+5:302018-01-23T18:46:54+5:30
कर्नाटक येथे १९ ते २१ जानेवारी २०१८ दरम्यान झालेल्या राष्टÑीय बेंच प्रेस स्पर्धेत ठाण्याच्या संजय दाभोळकर यांनी अव्वल क्रमांक मिळवून बाजी मारली आहे.
ठाणे: सुपरमॅक्स कंपनीतील कामगार आणि बदलापूर येथील रहिवाशी संजय दाभोळकर यांनी कर्नाटक येथे झालेल्या राष्टÑीय बेंचप्रेस स्पर्धेत ८२.५ किलो वजनी गटात १२५ किलोचे बेंच प्रेस उचलून देशात अव्वल क्रमांक मिळवला. त्यांच्या या यशाबद्दल कंपनीतर्फे त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.
वीर हनुमान क्रीडा सांस्कृतिक युवा जन संघातर्फे कर्नाटक राज्यातील हॉस्पेट (जिल्हा बेल्लारी) याठिकाणी या स्पर्धा आयोजित केल्या होत्या. सबज्युनिअर, ज्युनिअर, वरिष्ठ आणि मास्टर स्त्री आणि पुरुष अशा वेगवेगळया गटांमध्ये १८ संघ आणि ३०० स्पर्धकांनी यामध्ये भाग घेतला होता. दाभोळकर यांनी ८२.५ किलो वजनी गटात मास्टर -२ मध्ये ५० वर्षांवरील स्पर्धेत देशभरातून प्रथम क्रमांक मिळवला. द्वितीय क्रमांकही महाराष्टÑाच्या स्पर्धकाने तर तृतीय क्रमांक कर्नाटकाच्या संघाने पटकविला.
अलीकडेच नाशिक येथे झालेल्या ८२.५ किलो वजनी गटात त्यांनी १२० किलो वजन उचलून ‘महाराष्टÑ टायटल’ हा किताब पटकवला होता. एप्रिल २०१७ मध्ये थायलंड, पटाया येथे झालेल्या आंतरराष्टÑीय पॉवरलिफ्टींग स्पर्धेतही त्यांनी भारताला सुवर्णपदक मिळवून दिले आहे. ठाण्यातील सुपरमॅक्स पर्सनल केअर प्रा. लि. कंपनीत ते कार्यरत असून स्पर्धेसाठी त्यांना महाराष्टÑ राष्टÑीय कामगार संघटना (इंटक) चे अध्यक्ष सचिन अहिर, सरचिटणीस गोविंद मोहिते आणि कंपनीतील प्लांन्ट व्यवस्थापक उदय देसाई आदींचे विशेष सहकार्य लाभल्याचे त्यांनी सांगितले.