ठाण्यातील संगीत कट्टयावर "सूनहरी यादे" चे बहारदार सादरीकरण, जुनी नविन अजरामर गाणी सादर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 14, 2018 03:22 PM2018-10-14T15:22:41+5:302018-10-14T15:24:30+5:30
संगीत कट्टयावर शुक्रवारी "सूनहरी यादे" या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
ठाणे : ठाण्यातील संगीत कट्ट्यावर आयोजित केलेल्या सूनहरी यादे" या कार्यक्रमात बॉलीवूडमधील जुनी नविन अजरामर गाणी सादर करण्यात आली.यात गायन, वादन, निवेदन अशा गोष्टींना संधी देण्यात आली. यंदाचा हा २२ क्रं चा कट्टा होता.
यावेळी संदीप भोसले यांनी कहना है, चांदसी मेहबूबा हि गाणी सादर करत रसिकांची मने जिंकली. विजय परांजपे यांनी लाखो है निगाहो मै, बार बार देखो हि गाणी सादर केली. भारती परांजपे यांनी अजीब दास्ता है ये, आपकी नाजरो नै हि गाणी सादर केली. संदीप भोसले व राज भोसले या वडील-मुलाच्या जोडीने तेरा मझसे है पहले का नाता कोई हे गाणे सादर करत उपस्तिथांची दाद मिळवली. श्रुती गोसावी यांनी कैसी पहेली है ये, हवा के झोके, बन के तीतली हि गाणी सादर करत रसिकांना संगीतमय वातावरणात नेले. राज भोसले या तरुण गायकाने जुन्या नवीन गाण्यांचा मॅशअप सादर केला. दामिनी पाटील हिने सेक्सोफोनवर विविध गाणी सादर केली. दीपक भोईर व शुभांगी आकोलकर यांनी एक प्यार का नगमा है हे गाणे सादर केले. विजया केळकर,प्रभाकर केळकर या जेष्ठ जोडीने एक शेहंनशहाने बनवा के ताजमहाल हे गाणे सादर करत कलेला वयाची मर्यादा नसते आपण कोणत्याही वयात गाऊ शकतो याचा प्रत्यय प्रेक्षकांना दिला. प्रभाकर केळकर यांनी इतनी हसी इतनी जवा रात है,जब जब तू मेरे सामने आये हि गाणी देखील सादर केली. यावेळी विजया केळकर यांचा वाढदिवस संगीत कट्ट्याच्या कलाकारांकडून साजरा करण्यात आला व त्यांना दीर्घाआयुष्यासाठी शुभेछा देण्यात आल्या. कलाकारातील कला गुणांना वाव मिळावा व त्यांना हक्काचे व्यासपीठ उपलब्ध व्हावे या उद्देशाने आम्ही संगीत कट्ट्याची स्थापना केली. विविध ठिकाणाहून येणारे गीतकार, संगीतकार, गायक यांना प्रधान्य देण्याचा संगीत कट्ट्याचा उद्देश आहे असे किरण नाकती यांनी सांगितले. कार्यक्रमाचे निवेदन माधुरी कोळी यांनी केले. दीपप्रज्वलन राम भोसले यांनी केले.