‘त्या’ ५३० कासवांना वनखात्याचा आठ दिवस पाहुणचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 9, 2018 05:12 AM2018-09-09T05:12:33+5:302018-09-09T05:12:37+5:30

तस्करीसाठी कर्नाटक, आंध्रमधून आणलेले सुमारे ५३० कासव येथील वनखात्याने कुर्ला टर्मिनस येथे हस्तगत केले.

'Those' 530 tortoises are eight days of forestry | ‘त्या’ ५३० कासवांना वनखात्याचा आठ दिवस पाहुणचार

‘त्या’ ५३० कासवांना वनखात्याचा आठ दिवस पाहुणचार

Next

ठाणे : तस्करीसाठी कर्नाटक, आंध्रमधून आणलेले सुमारे ५३० कासव येथील वनखात्याने कुर्ला टर्मिनस येथे हस्तगत केले. शनिवारी ठाणे न्यायालयाने ते सोडण्याची परवानगी दिली. यानुसार, या कासवांचा निवास असलेल्या कर्नाटक न्यायालयाकडून तशी परवानगी घेऊनच त्यांना तेथे सोडावे लागेल. तोपर्यंत या कासवांना येथील वनखात्याचा सुमारे आठ दिवस तरी पाहुणचार घ्यावा लागणार आहे.
या कासवांची तस्करीकरूनरेल्वेने कुर्ला येथे आणलेल्या शोपी (३४) या महिलेलादेखील न्यायालयासमोर हजार केले असता तिला पाच दिवसांची वनविभागाची कस्टडी मिळाल्याचे येथील वनपरिक्षेत्र अधिकारी संतोष कंक यांनी लोकमतला सांगितले. कर्नाटक -आंध्र प्रदेशातून कासवांची ही ५३० पिले गुरुवारी रेल्वेद्वारे कुर्ला येथे येणार असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार, वनअधिकाऱ्यांसह डीआरआय आणि डब्ल्यूसीसीबीच्या अधिकाºयांनी सापळा रचून या महिलेला कासवांसह रंगेहाथ पकडल्याचे कंक यांनी स्पष्ट केले.
मुंबईतील एका पार्टीने या कासवांची आॅर्डर दिल्याचे पकडलेल्या या शोपीकडून सांगितले जात आहे. त्याच्या सांगण्यानुसार कासवांची ही तस्करी करण्यात आली. इतक्या मोठ्या प्रमाणात कासवांची मागणी करणाºयापर्यंत ही शोपी घेऊन जाईल, अशी वनअधिकाºयांची अपेक्षा आहे. त्यासाठी तिच्याशी सुसंवाद साधून या तस्करीचे राज उलगडण्याचा प्रयत्न वनअधिकाºयांकडून सुरू आहे. वनखात्याच्या कस्टडीतील या महिलेकडून अन्यही काही माहिती मिळण्याची शक्यता आहे. त्यानुसार, तिला बोलते करण्याचा प्रयत्न सुरू आहे.
तस्करीच्या नावाखाली पकडलेल्या या कासवांचे मेडिकल करण्यात येत आहे. त्यांना पोषक खाद्यही दिले जात आहे. या कासवांना येथील हवामान मानवणार नाही. त्यांचा अधिवास कर्नाटक, आंध्रमधील आहे. यामुळे त्यांना तेथील जंगलात सोडावे लागेल. यासाठी आपल्या न्यायालयाने शनिवारी परवानगी दिली. याप्रमाणे आता कर्नाटक न्यायालयाची परवानगी घेऊन कर्नाटक वनअधिकाºयांच्या साहाय्याने तेथील जंगलात, तलावांत त्यांना सोडावे लागेल. त्यासाठी आपले खास पथक पाठवावे लागेल. तोपर्यंत या कासवांच्या पिलांची रोज निगा राखून त्यांचे मेडिकलही करावे लागणार असल्याचे कंक यांच्याकडून सांगण्यात आले.

Web Title: 'Those' 530 tortoises are eight days of forestry

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.