आंबा महोत्सवात ठाणेकरांनी फस्त केले १ कोटींचे आंबे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 10, 2018 06:20 AM2018-05-10T06:20:27+5:302018-05-10T06:20:27+5:30
ठाण्यात सुरू असलेल्या आंबा महोत्सवात,ठाणेकर नागरिकांनी अवघ्या आठ दिवसात १ कोटी रुपयांचा कोकणातील हापूस आंबे फस्त केले आहेत. तर,शेवटच्या दोन दिवसांमध्ये जवळपास आणखी ४५ लाखांचा आंबे फस्त होण्याची शक्यता आयोजकांनी वर्तवली आहे.
- पंकज रोडेकर
ठाणे - ठाण्यात सुरू असलेल्या आंबा महोत्सवात,ठाणेकर नागरिकांनी अवघ्या आठ दिवसात १ कोटी रुपयांचा कोकणातील हापूस आंबे फस्त केले आहेत. तर,शेवटच्या दोन दिवसांमध्ये जवळपास आणखी ४५ लाखांचा आंबे फस्त होण्याची शक्यता आयोजकांनी वर्तवली आहे. या महोत्सवात एखादा आंबा खराब निघालास त्या बदल्यात दुसरा आंबा दिला जात असल्याची माहिती आयोजकांनी दिली.
महाराष्टÑ राज्य कृषी पणन मंडळ पुरस्कृत आणि संस्कार व कोकण विकास प्रतिष्ठान यांच्यावतीने ठाण्यात १ ते १० मे दरम्यान हा महोत्सव आयोजिला आहे. यामध्ये प्रामुख्याने देवगड आणि रत्नागिरी या जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे ३५ स्टॉल्स् आहेत. तेथे ४५० रुपये इतका डझनाचा भाव असून दिवसभराच्या सरासरीनुसार या महोत्सवात १,८०० रुपयांच्या ४ डझन असलेल्या २० पेट्यांची खरेदी केली जात आहे. त्यानुसार त्या ३५ स्टॉल्स्वरून २ लाख ८८ हजार डझन आंबे खरेदी केल्यामुळे या महोत्सवात अवघ्या आठ दिवसात १ कोटी ८० हजारांची उलाढाल झाली. तर, शेवटच्या दोन दिवसात आंबे सवलतीत मिळतात, म्हणून आंबे खरेदीसाठी नागरिकांची गर्दी होते. त्यामुळे या दोन दिवसात जवळपास ४५ लाखांची आणखी उलाढाल होण्याची शक्यता या महोत्सवाचे आयोजक राजेंद्र तावडे यांनी लोकमतशी बोलताना वर्तवली. या महोत्सवाचे हे १३ वर्ष असून मराठी चित्रपटसृष्टीतील विविध मराठी कलाकरांनी आंब्याची चव चाखली आहे.
शेतकºयांना महोत्सवात स्टॉल : या महोत्सवात आंब्यांचे मोठे व्यावसायिकांकडून दरवर्षीप्रमाणे यंदाही स्टॉल्स मिळावेत अशी मागणी होती. पण, शेतकºयांना या महोत्सवात प्रामुख्याने प्राधान्य दिले जाते. ते देताना, त्या शेतकºयांचा सातबारा आणि आंब्यांची झाडे पाहण्यात येतात. त्यामुळे येथे नैसर्गिकरित्या आंबे पिकवले जात असल्याने येथे कोणतीही फसवणूक केली जात नाही. त्यातच खराब आंबा निघालास,पुन्हा आंबा दिला जाण्यात येत आहे.
११ एप्रिल ते २७ मे दरम्यान, दादर, ठाणे, विर्लेपाले, बोरीवली आणि मुलुंड या पाच ठिकाणी आंबा महोत्सव भरला जात आहे. त्यानंतर वातावरण आणि पावसाळा लक्षात आंबे विक्री करणे थांबवले जाते. तसेच गतवर्षात ठाण्यात महोत्सवात साधारणता: एक ते दीड कोटी रुपयांचे आंब्यांची उलाढाल झाल्याची माहिती आयोजकांनी दिली.