तिर्थक्षेत्र वज्रेश्वरी देवी मंदिरात धाडसी दरोडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 10, 2019 05:09 PM2019-05-10T17:09:18+5:302019-05-10T17:26:32+5:30

भिवंडी : महाराष्ट्रात सुप्रसिद्ध असलेल्या तीर्थक्षेत्र वज्रेश्वरी देवी मंदिरात आज शुक्रवारी रोजी पहाटेच्या दरम्यान पाच ते सहा दरोडेखोरांच्या टोळीने ...

Threatened robbery in the goddess Tirthakshetra Vajreshwari Devi temple | तिर्थक्षेत्र वज्रेश्वरी देवी मंदिरात धाडसी दरोडा

तिर्थक्षेत्र वज्रेश्वरी देवी मंदिरात धाडसी दरोडा

Next
ठळक मुद्देसुरक्षाव्यवस्था कमजोर असल्याने मंदिरात दरोडापाच दिवसांपुर्वी देवीची वार्षिक यात्रा संपलीयात्रेच्या दिवसांत दरोडेखोरांनी रेखी केल्याचा संशय

भिवंडी : महाराष्ट्रात सुप्रसिद्ध असलेल्या तीर्थक्षेत्र वज्रेश्वरी देवी मंदिरात आज शुक्रवारी रोजी पहाटेच्या दरम्यान पाच ते सहा दरोडेखोरांच्या टोळीने देवीच्या मुख्य गाभाऱ्यातील तीन दानपेट्या आणि दुस-या गाभा-यातील दोन दानपेट्या फोडून सुमारे आठ ते दहा लाख रु पयांची रक्कम चोरून नेल्याने खळबळ उडाली असून मंदिराच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.
शुक्रवारी पहाटे तीन ते साडेतीन वाजताच्या दरम्यान पाच ते सहा दरोडेखोरांच्या टोळीने मंदिराच्या मागच्या बाजूने मंदिरात प्रवेश करून मंदीर सुरक्षेसाठी असलेल्या एकमेव सुरक्षा रक्षकाला मागून येऊन पकडून दोरीने त्याचे हात पाय बांधले.तसेच देवीच्या मुख्य गाभा-यातील कुलूप तोडून देवीच्या मुख्य गाभा-यात तीन दरोडेखोरांनी प्रवेश करून कटावणी आणि स्क्रूड्रायव्हरच्या मदतीने तीन दानपेट्या फोडल्या. तर पहिल्या गाभा-यातील दोन दानपेट्या फोडून त्यातील सुमारे आठ ते दहा लाख रु पयांची रक्कम गोणींमध्ये भरून पसार झाले.हा सर्व प्रकार मंदिराच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांत कैद झाला आहे. या घटनेनंतर सुरक्षारक्षकाने आपली सुटका करून घेत मंदिराच्या पायथ्याशी राहणारे विश्वस्त गोसावी यांना या घटनेची माहिती दिली. त्यानंतर त्यांनी गावातील ग्रामस्थांना आणि पोलिसांना कळविल्याने गावकऱ्यांना या धाडसी दरोड्याची माहिती झाली. या घटनेमुळे गावातील सर्व देवीभक्तांनी देवळाकडे धाव घेतली.
पाच दिवसांपूर्वी म्हणजेच तीन ते पाच मे दरम्यान वज्रेश्वरी देवी मंदिराचा वार्षिक यात्रोउत्सव पार पडला. त्यावेळी अनेक देवीभक्तांनी देवळातील देवीचे दर्शन घेऊन तेथील दानपेटीमध्ये मोठया संख्येने दान टाकले होते.याची दरोडेखोरांनी उत्सवा दरम्यान रेकी करून मंदिरात येण्यासाठी व बाहेर जाण्यासाठी जाणा-या मार्गाचा आभ्यास केल्याची शक्यता पोलीसांनी व्यक्त केली.
दरम्यान देवळात मोठा दरोडा पडूनही सदर देवस्थानच्या विश्वस्त कमिटीवर असलेल्या परंपरागत विश्वस्तांशिवाय एकही विश्वस्त घटनास्थळी उपस्थित न राहिल्याने ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला. या घटनेचा निषेध करण्यासाठी म्हणून आज सकाळपासून दुपारपर्यंत गावातील हार फुल विक्रेते आणि इतर व्यापा-यांनी आपआपली दुकाने बंद करून देवीमंदिराच्या पायथ्याशी जमून जाहीर निषेध केला. तसेच विश्वस्तांनी मंदिर सुरक्षेत हलगर्जीपणा केल्यामुळेच हा दरोडा पडला असल्याची भावना व्यक्त केली.
यापुर्वी वज्रेश्वरीदेवी मंदिराच्या परिसरातील दत्त मंदिर, हनुमान मंदिर, गोधडे महाराज समाधी या ठिकाणी चो-या झालेल्या आहेत.या बाबत गणेशपुरी पोलीस ठाण्यात तक्रारी दाखल करूनही या चोरींचा तपास योग्यरितीने झाला नाही.असा आरोप ग्रामस्थांनी केला असून या चो-यांची दखल घेत विश्वस्त मंडळाने सुरक्षा व्यवस्थेची कोणतीही खबरदारी घेतली नाही,असे सांगीतले. जिल्ह्यातील सर्वात मोठ्या विश्वस्त संस्थेच्या देवीमंदिराची सुरक्षा व्यवस्था केवळ एका सुरक्षारक्षकावर सोपविण्यात आली होती.याबाबत स्थानिक ग्रामस्थांनी रोष व्यक्त करीत या सर्व बाबींची पोलीसांनी चौकशी करून कारवाई करण्याची मागणी केली आहे.
घटनास्थळी स्थानिक आमदार शांताराम मोरे यांनी भेट देऊन पाहणी केली. तसेच ठाणे ग्रामिण पोलीस विभागाचे अप्पर पोलीस अधीक्षक संजयकुमार पाटील,उपविभागीय पोलीस अधिकारी दिलीप गोडबोले, गणेशपुरी पोलीस ठाण्याचे सहा.पोलीस निरीक्षक परशुराम लोंढे आदी पोलीस अधिका-यांनी भेट दिली आणि लवकरात लवकर दरोडेखोर पकडण्यात येतील,अशी ग्वाही पोलीस अधिकारी यांनी दिली.

Web Title: Threatened robbery in the goddess Tirthakshetra Vajreshwari Devi temple

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.