जम्मू काश्मीरमधून मुंबई ठाण्यात करोडोंच्या चरसची विक्र ी: तिघांना मुंब्य्रातून अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2018 01:25 AM2018-03-04T01:25:58+5:302018-03-04T01:25:58+5:30

मुंब्य्रातून साजीद खान याच्यासह तिधांना चरसची तस्करी प्रकरणी ठाण्याच्या खंडणी विरोधी पथकाने अटक केली आहे. त्यांच्याकडून १५ हजार ७०० ग्रॅम वजनाचे ३१ कोटींचे चरस हस्तगत करण्यात आले आहे.

Three arrested in drug racket: they sold charas of Jammu and Kashmir | जम्मू काश्मीरमधून मुंबई ठाण्यात करोडोंच्या चरसची विक्र ी: तिघांना मुंब्य्रातून अटक

जम्मू काश्मीरमधून मुंबई ठाण्यात करोडोंच्या चरसची विक्र ी: तिघांना मुंब्य्रातून अटक

googlenewsNext
ठळक मुद्देठाणे खंडणी विरोधी पथकाची कारवाईरोकडसह ३१ कोटींचे चरस हस्तगतमोठे रॅकेट असण्याची शक्यता

ठाणो: थेट जम्मू काश्मीरमधून मुंबई ठाण्यात चरसची तस्करी करणा-या साजीद खान (३८), अब्दुल गुजली (५५) आणि मोहम्मद मकबूल भट (५५) या तिघांना मुंब्य्रातून ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या खंडणी विरोधी पथकाने अटक केली आहे. त्यांच्याकडून १५ हजार ७०० ग्रॅम चरस या अमली पदार्थासह ३२ लाख ४० हजार ७३० रु पयांचा ऐवज हस्तगत केल्याची माहिती अतिरिक्त पोलीस आयुक्त मकरंद रानडे यांनी दिली. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत या चरसची किंमत सुमारे ३१ कोटींच्या घरात असल्याची माहिती सूत्रंनी दिली.
मुंब्य्रातील मित्तल ग्राऊंड येथील सार्वजनिक शौचालयासमोर काही व्यक्ती चरस या अमली पदार्थाची १ मार्च रोजी विक्र ी करण्यासाठी येणार असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप शर्मा यांना मिळाली होती. याच माहितीच्या आधारे मुंब्रा रेल्वे स्थानक ते कौसा भागाकडे जाणा-या रस्त्यावर उपायुक्त अभिषेक त्रिमुखे यांच्या मार्गदर्शनाखाली शर्मा यांच्यासह निरीक्षक राजकुमार कोथमिरे, विकास घोडके, उपनिरीक्षक हेमंत ढोले, अविनाश महाजन, विकास बाबर आदींच्या पथकाने सापळा लावून गुरु वारी दुपारी ३.४५ वाजण्याच्या सुमारास साजीद (रा. अमृतनगर, मुंब्रा) याच्या ताब्यातून 8०० ग्रॅम चरस, अब्दुल गुजली (रा. संबल, जम्मू काश्मीर ) आणि मोहम्मद मुक्ता (रा. पिहल पोरा, जि. गंधरबल, जम्मू काश्मीर ) याच्याकडून ६ हजार १०० ग्रॅम चरस असे ३१ लाख ४० हजारांचे १५ किलो ७०० ग्रॅम चरस तसेच एक लाख ७३० रु पयांची रोकड असा ३२ लाख ४० हजार ७३० रु पयांचा ऐवज त्यांच्याकडून हस्तगत करण्यात आला. त्यांनी हे चरस जम्मू काश्मीर येथून आणल्याची कबूली दिली. या तिघांविरु द्ध मुंब्रा पोलीस ठाण्यात गुंगीकारक औषधी द्रव्य आणि मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांना ५ मार्च २०१८ र्पयत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत. यामागे आणखी कोणती टोळी सक्र ीय आहे का? किती दिवसांपासून ते ही तस्करी करीत होते, या सर्व बाबींचा तपास सुरु असल्याची माहिती रानडे यांनी दिली.

Web Title: Three arrested in drug racket: they sold charas of Jammu and Kashmir

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.