टीएमटीची भाजपाला धडक, शिवसेनेचा दणदणीत विजय, दोघे बिनविरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 30, 2017 12:50 AM2017-10-30T00:50:58+5:302017-10-30T00:51:27+5:30

ठाणे परिवहन सेवेच्या (टीएमटी) एम्प्लॉईज युनियनसाठी १२ वर्षांनी झालेल्या निवडणुकीत शिवसेनेच्या धर्मवीर पॅनेलने बाजी मारली.

TMT defeats BJP, Shivsena's winning sound, both uncontested | टीएमटीची भाजपाला धडक, शिवसेनेचा दणदणीत विजय, दोघे बिनविरोध

टीएमटीची भाजपाला धडक, शिवसेनेचा दणदणीत विजय, दोघे बिनविरोध

Next

ठाणे : ठाणे परिवहन सेवेच्या (टीएमटी) एम्प्लॉईज युनियनसाठी १२ वर्षांनी झालेल्या निवडणुकीत शिवसेनेच्या धर्मवीर पॅनेलने बाजी मारली. सर्वच्या सर्व ३७ उमेदवार निवडून आल्याने विरोधकांची धूळधाण उडाली. यंदा या निवडणुकीत प्रथमच उतरलेल्या भाजपाने प्रतिष्ठा पणाला लावल्याचे दिसून येत होते. कामगारांना नोकरीत कायम करण्याचे आश्वासन थेट मुख्यमंत्र्यांकडून मिळवूनही त्या पक्षाला सपाटून मार खावा लागला.
एव्हढेच नव्हे, तर शरद रावप्रणित युनियनलाच्या प्रगती पॅनेललाही कामगारांनी पसंती दिली नाही आणि शिवसेनेच्या हाती सरसकट सत्ता दिली. या निवडणुकीत दोन उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत.
ठाणे परिवहन सेवेच्या एम्प्लॉईज युनियनच्या ३७ जागांसाठी शनिवारी शांततेत मतदान प्रक्रि या पार पडली. १,८८९ मतदारांपैकी १,७६८ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावल्याने ९३.५० टक्के मतदान झाले होते. या निवडणुकीत भाजपाने पूर्ण ताकदीनिशी उतरल्याचे दाखवून दिले. आमदार संजय केळकर यांच्यासह वेगवेगळे पदाधिकारी उतरले होते. शिवाय त्यांनी मुख्यमंत्र्यांना निवेदन देत शिवसेनेवर कुरघोडीचा प्रयत्न केला. आगारापासून कामगारांच्या प्रश्नांपर्यंत अनेक आश्वासने देण्यात आली. त्यामुळे व्यवस्थेच्या दृष्टीने खिळखिळी झालेली टीएमटी निवडणुकीच्या टॉनिकने मात्र ताजीतवानी झाल्याचे पाहायला मिळाले. भाजपाच्या या हालचालींमुळे प्रथमच शिवसेनेची प्रतिष्ठा पणाला लागल्याचे चित्र निर्माण झाले आणि त्या पक्षाचेही नेते पूर्ण ताकद लावत निवडणुकीत उतरले. एकंदरीतच या निवडणुकीची रंगत दिवसेंदिवस वाढत गेली. भाजपाने ३७ पैकी ३० , शिवसेनेने ३७ तसेच शरद रावप्रणित संघटनेच्या प्रगती पॅनलचे २२ उमेदवार रिंगणात उतरले होते .
मतदान पार पडल्यावर शनिवारी सायंकाळी लगेचच मतमोजणीला सुरूवात झाली. पहिल्या फेरीपासून धर्मवीर पॅनलने घेतलेली मतांची आघाडी शेवटपर्यंत कायम ठेवली. मध्यरात्री एकच्या सुमारास निकाल हाती आला आणि शिवसेनेने एकहाती गड राखल्याचे स्पष्ट झाले.


धर्मवीर पॅनलचे दोघे बिनविरोध निवडून आले. अध्यक्षपदी निवड झालेल्या गणेश देशमुख यांना ८१७, उपाध्यक्षपदाचे गोविंद सूर्यवंशी यांना ८१६ आणि दुसरे उपाध्यक्ष शिवाजी शिंदे यांना ८३१, सरचिटणीस सुनील म्हामुणकर यांना ९२१, कार्यचिटणीस विजय बाम्हणे ८९७, चिटणीस विलास निकम ९०२ आणि खजिनदारपदी निवड झालेल्या मनोहर जांगळे यांना ७९८ मते मिळाली. विश्वास टिकवला : टीएमटीसमोर अडचणीचा डोंगर आहे. सेवा पंक्चर झाल्याची टीका सुरू आहे. कामगारांचेही प्रश्न सोडवण्याची गरज आहे. या स्थितीत टीएमटी शिवसेनेच्या हातातून जाईल, असा विरोधकांचा दावा होता. पण या स्थितीतही कामगारांचा विश्वास कायम ठेवण्यात शिवसेना यशस्वी झाली.

Web Title: TMT defeats BJP, Shivsena's winning sound, both uncontested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.