भिवंडीत दुचाकी चोरांकडून वीस दुचाकी जप्त, नऊ जणांना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2018 09:12 PM2018-04-16T21:12:13+5:302018-04-16T21:12:13+5:30
भिवंडी : दुचाकी कंपनीत काम करणाऱ्या तरूणाने कंपनीच्या दुचाकी रिकव्हर करीत असताना शहरात व शहराबाहेर दुचाकी चोरण्याचा नवीन फंडा केला.त्यामध्ये त्याने स्वत: बरोबर गोवलेल्या नऊ जणांना शांतीनगर पोलीस ठाण्याच्या पोलीसांनी शिताफीने अटक केली.
शहरातून दुचाकी चोरीच्या घटना वाढीस लागलेल्या असताना शांतीगनर भागात एक बाईक चोर असल्याची माहिती पोलीसांना मिळाली. त्यानुसार पोलीसांनी दोन पथके तयार करून शहरातील नागाव येथील अनमोल हॉटेल येथून अयाजअली रेहमतअली अन्सारी यास ताब्यात घेतले. त्याला पोलीसी खाक्या दाखविला असता त्याच्याकडे एक चोरीची दुचाकी आढळून आली.त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता भिवंडी, कल्याण, घाटकोपर व मुंबई येथून चोरलेल्या गाड्या ठिकठिकाणी स्वस्तात विकल्याची माहिती मिळाली. पोलीस पथकाने तब्बल वीस बाईक विविध ठिकाणाहून जप्त करीत या चोरीत सामिल असलेल्या आठ जणांना अटक केली . विक्कीकुमार मैवालाल गौड , मोहम्मद अख्तर उर्फ सोनू अन्वर अन्सारी , अब्दुल माजिद मो. साबीर अन्सारी हे टोळीतील सदस्य ठिकठिकाणाहून डुप्लिकेट चवीच्या सहाय्याने बाईक चोरत होते. त्यानंतर अयाजअली रेहमतअली अन्सारी हा दुसरे साथीदार सलमान अनिस खान , नसीम अहमद जावेद मन्सुरी , किफायत विसउल्ला खान , हसन अब्दुल रशीद अन्सारी , शेहजाद अंजुम सईद अहमद अन्सारी हे चोरलेल्या दुचाकी वेगवेगळ्या ठिकाणी विक्र ी करीत होते.पोलीसांनी त्यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून दुचाकी जप्त करण्यात आल्या. अशा विविध ठिकाणाहून पोलीसांनी सात लाख पन्नास हजार रूपये किंमतीच्या वीस दुचाकी जप्त केल्या असुन नऊ जणांना अटक केली आहे.
पोलीसांनी हस्तगत केलेल्या बहुसंख्य दुचाकी मालेगाव परिसरातून ताब्यात घेतल्या असून या टोळीचा मास्टर मार्इंड अयाजअली रेहमतअली अन्सारी हा पूर्वी बजाज फायनान्स मध्ये गाड्या रिकव्हरीचे काम करीत असल्याने तो बाईक विक्र ी बाबतची प्रक्रि या जाणत होता.त्याने ापल्या अनुभवाचा उपयोग त्याने दुचाकी चोरीच्या गुन्ह्यात करीत असल्याची माहिती पोलीस उपायुक्त सुनील भारध्वज यांनी पत्रकारांना दिली.या कारवाईत सहा.पोलीस आयुक्त सैफन मुजावर,वरिष्ठ पोलीस निरिक्षक किशोर जाधव यांनी पोलीसांच्या दोन्ही पथकांना मार्गदर्शन केल्याने पोलीसंनी ही कामगीरी बजावली.