शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 6, 2019 12:44 AM2019-03-06T00:44:42+5:302019-03-06T00:44:44+5:30
महाविद्यालयीन कर्मचाऱ्यांना लागू केलेली आश्वासीत प्रगती योजना शासन निर्णयानुसार रद्द करण्यात आली आहे.
ठाणे : महाविद्यालयीन कर्मचाऱ्यांना लागू केलेली आश्वासीत प्रगती योजना शासन निर्णयानुसार रद्द करण्यात आली आहे. या निर्णयाविरोधात येथील एन.के.टी महाविद्यालयाच्या बाहेर अशासकीय महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचारी संघाच्या नेतृत्वाखाली शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी मंगळवारपासून बेमुदत संप पुकारला आहे.
शासन निर्णयानुसार १९९४ पासून कालबद्ध पदोन्नती योजनेचा लाभ कर्मचाºयांना देण्यात येत होता. हा लाभ शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाºयांना त्यांच्या १२ ते २४ वर्षाच्या सेवा कालावधीत देण्यात येत होता. परंतु, सदर योजनेस वित्त विभागाची मान्यता नसल्याचे कारण देऊन सदर योजना रद्दबादल ठरविण्यात आल्याचा आरोप या संपातील शिक्षकेत्तर कर्मचाºयांकडून होत आहे.या शासन निर्णयामुळे महाविद्यालयातील लाखो शिक्षकेत्तर कर्मचाºयांचे आर्थिक नुकसान होणार आहे. यास कडाडून विरोध करण्यासह अन्यायकारी शासन निर्णय त्त्वरीत रद्द करण्याच्या मागणीसाठी शिक्षकेतर कर्मचाºयांकडून या बेमुदत संपाचे हत्यार उपसण्यात आल्याचे शिक्षकेत्तर कर्मचारी संघाचे वरिष्ठ पदाधिकारी असलेल्या हरीष पाटील यांनी स्पष्ट केले आहे.