राज्यातील अप्रशिक्षित दोन लाख अंगणवाडी सेविकांना आरोग्य सेवेच्या कामांची सक्ती; बरेवाईट होण्याची भीती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 10, 2018 07:00 PM2018-08-10T19:00:05+5:302018-08-10T19:09:29+5:30
राज्यातील गावखेडय़ांमधील घरोघर पोहोचलेल्या कर्मचाऱ्यांमध्ये अंगणवाडी सेविका हा महत्वाचा घटक आहे. त्यांच्या माध्यमातून शासनाच्या योजना घराघरात जात आहेत. पण आरोग्य खात्याच्या औषधी वाटपासारख्या जंत नाशक गोळ्या, पल्सपोलिओ डोस आदी जोखमींची कामे या अप्रशिक्षित अंगणवाडी सेविकांकडून सक्तीने केली जात असल्याची गंभीरबाब बृजपाल सिंग यांनी व्यक्त केली
ठाणे : जंतनाशक औषधींसह पल्सपोलीओ आदीं आरोख्य विभागाची जोखमीची कामे राज्यभरातील दोन लाखांपेक्षा अधिक अंगणवाडी सेविका, मदतनीस या अप्रशिक्षित कर्मचाऱ्यांकडून सक्तीने करून घेत आहेत. यातून लाभार्थ्यांचे बरेवाईट होण्याची शक्यता असल्याची गंभीरबाब महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघाचे राज्य सरचिटणीस बृजपाल सिंह यांनी उघडकीस आणली. यास वेळीच पायबंद घालणो आवश्यक आहे. यासाठी आरोग्य व आयसीडीएस अधिकाऱ्यांनी जोखमीच्या या सक्तीची मनमानी तत्काळ थांबवण्याचा इशारा निवेदनाव्दारे दिल्याचे त्यांनी सांगितले
राज्यातील गावखेडय़ांमधील घरोघर पोहोचलेल्या कर्मचाऱ्यांमध्ये अंगणवाडी सेविका हा महत्वाचा घटक आहे. त्यांच्या माध्यमातून शासनाच्या योजना घराघरात जात आहेत. पण आरोग्य खात्याच्या औषधी वाटपासारख्या जंत नाशक गोळ्या, पल्सपोलिओ डोस आदी जोखमींची कामे या अप्रशिक्षित अंगणवाडी सेविकांकडून सक्तीने केली जात असल्याची गंभीरबाब बृजपाल सिंग यांनी व्यक्त केली. गावातील प्रत्येक घरातील व्यक्ती या सेविका मदतीनस यांना ओळखतात. या अप्रशिक्षितकर्मचाऱ्यांकडून दिलेल्या औषधीपासून संबंधीत लाभाथ्र्याचे बरेवाईट झाल्यास हकनाक सेविकेला जबाबदार धरून दोष दिला जाणार असल्याचे बृजपाल सिंग यांच्याकडून स्पष्ट केले जात आहे.
तज्ज्ञ डॉक्टर, परिचारिका, आरोग्य सेवक आदी प्रशिक्षितांची कामे या अनाडी अंगणवाडी सेविकांकडून आरोग्य कर्मचाऱ्यांच्या आंदोलनकाळात करून घेतले जात आहे. अन्यायकारी सक्ती या आरोग्य अधिकाऱ्यांसह आयसीएसीएसच्या अधिकाऱ्यांकडून राज्यभर होत आहेत. यामध्ये मुंबईमधील सुमारे दहा हजार सेविका, मदतनीस, ठाणो, पालघर, नाशिक, रायगड आदीं जिल्ह्यांमध्ये प्रत्येकी आठ हजार सेविका, मदतनीस सध्या आरोग्याच्या कामाची जीव घेणी सक्ती अधिकाऱ्यांकडून होत असल्याचा आरोप करून राज्यातील सुमारे दोन लाख सेविका यात भरडल्या जात असल्याचे बृजपाल सिंह यांनी सांगितले.