दहा हजार मेट्रीक टन भाजीपाला विकणाऱ्या आठवडी बाजारास जिल्हाधिका-यांची भेट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2018 06:42 PM2018-07-28T18:42:31+5:302018-07-28T18:48:14+5:30
रेल्वे स्टेशनजवळ असलेल्या या गांवदेवी मैदानावर दर शनिवारी आठवडी बाजार सुरू करण्यात आला आहे. ग्राहकाना ताजा भाजीपाला तोही स्वस्तात देणाºया शेतकºयांचा देखील रोखीने व्यवहार होत आहे. शेतकºयांना मोठे उत्पन्न मिळवून देणारे २२ आठवडी बाजार जिल्ह्यात सुरू आहेत. यापैकी गांवदेवी मैदानावरील आजच्या १०१ व्या आठवडी बाजारास आमदार केळकर यांच्यासह जिल्हाधिका-यांनी खास भेट दिली
ठाणे : जिल्ह्यातील सुमारे दीड वर्षांपासून शिरोमणी संत सावता माळी शेतकरी आठवडी बाजार हा उपक्रम हाती घेतला आहे. आतापर्यंत जिल्ह्याभरातील २२ आठवडी बाजारात सुमारे दहा हजार मेट्रीक टन भाजीपाला व फळांची विक्री झाली. याप्रकारच्या येथील गांवदेवी मैदनावरील १०१ व्या आठवडी बाजारास आयोजक आमदार संजय केळकर व ठाणे जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांनी भेट देऊन दुकानदारांसह ग्राहकांची विचारपूस केली.
अगदी रेल्वे स्टेशनजवळ असलेल्या या गांवदेवी मैदानावर दर शनिवारी आठवडी बाजार सुरू करण्यात आला आहे. ग्राहकाना ताजा भाजीपाला तोही स्वस्तात देणा-या शेतक-यांचा देखील रोखीने व्यवहार होत आहे. शेतक-यांना मोठे उत्पन्न मिळवून देणारे २२ आठवडी बाजार जिल्ह्यात सुरू आहेत. यापैकी गांवदेवी मैदानावरील आजच्या १०१ व्या आठवडी बाजारास आमदार केळकर यांच्यासह जिल्हाधिका-यांनी खास भेट दिली. यावेळी तहसीलदार अधिक पाटील, स्थानिक नगरसेवक सुनेश जोशी, नगरसेविका प्रतिभा मढवी, सीताराम राणे, स्थायी समिती माजी सभापती प्रकाश नरसणा, डॉ. राजेश मढवी, संतोष साळुंखे, किरण धत्तूरे, स्वप्नाली साळवी, स्नेहा शिंदे उपस्थित होते. यावेळी उपस्थित शेतक-यांसह ग्राहकांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला.
गांवदेवी मैदानाप्रमाणेच उच्चभ्र लोकवस्तीच्या हिरानंदानी सोसायटीमध्ये देखील हा आठवडी बाजार मंगळवारी भरतो. यानुसार ठाणे शहरात ठिकठिकाणी नऊ आठवडी बाजार सुरू आहेत. कल्याण, डोंबिवली आदी शहरांसह जिल्ह्यात मागील दीड वर्षांपासून २२ आठवडी बाजार सुरू आहेत. या बाजारांमध्ये दहा हजार मेट्रीक टन भाजीपाला, कांदे - बटाटी, अन्नधान्य, कडधान्य आदी स्वत:त ग्राहकांना मिळाला आहे. या रोख विक्रीमुळे शेतक-यांमध्येही समाधान व्यक्त करण्यात येत असल्याचे वास्तव येथील गावदेवी आठवडी बाजाराचा फेरफटका मारला असता निदर्शनात आले आहे.