ठाणे जिल्ह्यातील शहापूरच्या २४ गावाना केवळ एका टँकरने पाणी पुरवठा; सांगलीच्या टँकर चालकांचा यंदा नकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 29, 2018 07:21 PM2018-03-29T19:21:10+5:302018-03-29T19:21:10+5:30

टंचाईवर मात करण्यासाठी पाणी पुरवठा विभाग सतर्क करण्यात आल्याचे सुतोवाच जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी विवके भीमनवार (सीईओ) यांनी सर्वसाधारण सभेत स्पष्ट केले. मात्र सदस्यांनी त्यावर समस्यांचा बडीमार करून त्यांचा दावा फोल ठरवण्याचा प्रयत्न केला

Water supply through only one tanker in 24 villages of Shahapur in Thane district; Denial of Sangli tanker driver this year | ठाणे जिल्ह्यातील शहापूरच्या २४ गावाना केवळ एका टँकरने पाणी पुरवठा; सांगलीच्या टँकर चालकांचा यंदा नकार

ठाणे जिल्ह्यातील शहापूरच्या २४ गावाना केवळ एका टँकरने पाणी पुरवठा; सांगलीच्या टँकर चालकांचा यंदा नकार

Next
ठळक मुद्देमुंबई, ठाण्यासह जिल्ह्यात सर्वच शहराना पाणी पुरवठा करणा-या शहापूर तालुक्यातील गावांमध्ये पुन्हा तीव्र पाणी टंचाई समस्यांचा बडीमार करून त्यांचा दावा फोल ठरवण्याचा प्रयत्नसांगलीच्या टँकरचालकाना आजपर्यंतही बील मिळाले नसल्याने ते यंदा पाणी पुरवठा करण्यास नकार

ठाणे: यदांच्या कडकडीत उन्हाळ्यात शहापूर तालुक्यात पाणी टंचाईने पुन्हा डोकेवर काढले. तालुक्यात ठिकठिकाणच्या २४ गावांमध्ये सध्या तीव्र पाणी समस्या सुरू आहे. त्या गावाना केवळ एक टॅकर पाणी पुरवठा करीत आहे. मागील वर्षाच्या टंचाईत पाणी पुरवठा करणाऱ्या सांगलीच्या टँकरचालकाना आजपर्यंतही बील मिळाले नसल्याने ते यंदा पाणी पुरवठा करण्यास नकार देत असल्याचे वास्तव शहापूर येथील जिल्हा परिषदेच्या सदस्या शोभा मेंगाळ यांनी उघड केले.
मुंबई, ठाण्यासह जिल्ह्यात सर्वच शहराना पाणी पुरवठा करणा-या शहापूर तालुक्यातील गावांमध्ये पुन्हा तीव्र पाणी टंचाई सुरू झाली. या टंचाईवर मात करण्यासाठी पाणी पुरवठा विभाग सतर्क करण्यात आल्याचे सुतोवाच जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी विवके भीमनवार (सीईओ) यांनी सर्वसाधारण सभेत स्पष्ट केले. मात्र सदस्यांनी त्यावर समस्यांचा बडीमार करून त्यांचा दावा फोल ठरवण्याचा प्रयत्न केला. टंचाई सुरू होताच टँकरची मागणी करण्याचे आावहन केले. परंतु सतत फे-या मारूनही टंकर मिळत नसल्याचे वास्तव मेंगाळ यांनी उघड केले. एवढेच नव्हे तर बोरिंगचा पाँईट देण्यासाठी देखील अभियंते फिरकत नसल्याची खंत मुरबाडचे सुभाष घरत यांनी व्यक्त केली. टंचाई संपेपर्यंत टँकर हो म्हणणारे अधिकारी शेवटी टँकर सुरू करता येणार नसल्याचे सांगून मोकळे होत असल्याचा अनुभवही घरत यांनी सीईओना ऐकावला.
खर्डीजवळील शिवळ, अजरूप, टेंभ्याचा पाडा, आंब्याचा पाडा आदी परिसरातील नागरिक विहिरीतील थेंबथेब पाणी गोळा करीत आहेत. तर काही रहिवाशी हंडे,ड्रम, टाक्या लोकलमध्ये टाकून कसा-याहून पाणी आणत असल्याचे चंदे या सदस्याने सांगितले. तर सपाटपाडा, हिव, अनदाड, कासगाव, धसई, सरड्याचा पाडा या गावांमध्ये देखील तीव्र पाणी टंचाई सुरू असल्याचे वंदना भांडे यांनी सीईओंच्या निदर्शनात आणून देत जिल्ह्यातील पाणी टंचाई उग्र रूप धारण करीत असल्याचे या सदस्यांकडून ऐकायला मिळाले. यावर ग्रामीण पाणी पुरवठा विभागाकडून काय हालचाली होणार याकडे आता ग्रामस्थांचे लक्ष लागून आहे.

Web Title: Water supply through only one tanker in 24 villages of Shahapur in Thane district; Denial of Sangli tanker driver this year

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.