डोंबिवलीच्या भाजपा शहर उपाध्यक्षाकडे मिळाली शस्त्रे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2019 05:40 AM2019-01-17T05:40:18+5:302019-01-17T05:40:35+5:30
मानपाडा रोड परिसरात ‘तपस्या हाउस आॅफ फॅशन’ या दुकानात शस्त्रांचा हा साठा सापडला.
कल्याण (ठाणे) : रा. स्व. संघाचा कार्यकर्ता आणि भाजपाचा डोंबिवली पूर्वेचा उपाध्यक्ष धनंजय कुलकर्णी (४९) याच्याकडून पोलिसांनी विक्रीवर बंदी असलेली तब्बल १७० शस्त्रे हस्तगत केली आहे.
मानपाडा रोड परिसरात ‘तपस्या हाउस आॅफ फॅशन’ या दुकानात शस्त्रांचा हा साठा सापडला. कल्याण गुन्हे शाखेने मंगळवारी कुलकर्णीला अटक केली. पोलिसांनी पोलीस कोठडीची मागणी न केल्याने मंगळवारी त्यास न्यायालयीन कोठडी देण्यात आली. मात्र, माध्यमांमध्ये याबाबत चर्चा सुरू झाल्याने कुलकर्णीला पोलीस कोठडी मिळावी, यासाठी पोलिसांची धावाधाव सुरू आहे. पोलिसांच्या अर्जावर आता गुरुवारी सुनावणी होईल. कुलकर्णीने एवढी शस्त्रे कशाकरिता बाळगली होती? घातपात घडवण्याचा त्याचा प्रयत्न होता का? या दृष्टीने पोलीस तपास करीत आहेत.
काय काय सापडले?
६२ स्टील तसेच पितळी धातूचे फायटर्स, ३८ बटणचाकू, २५ चॉपर्स, १० तलवारी,
९ कुकऱ्या, ९ गुप्त्या, ५ सुरे, ३ कुºहाडी,
१ कोयता, १ एअरगन
दंगली घडविण्याचा कट - काँग्रेस
निवडणूक पार्श्वभूमीवर दंगली घडवण्यासाठी हा शस्त्रसाठा केल्याची शक्यता आहे. राज्यातील भाजपा कार्यकर्त्यांच्या घराची झडती घ्या, अशी मागणी काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी केली.