कारणे सांगण्यापेक्षा एकजुटीने काम करा, आयुक्तांची ठाणे जि.प. अधिकाऱ्यांना तंबी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 28, 2018 08:36 PM2018-09-28T20:36:21+5:302018-09-28T20:39:07+5:30
जिल्ह्याचा विकास कामांचा आढावा घेतला. यावेळी ग्रामीण भागात योजना राबवताना येणाºया अडचणी कोणत्या आहेत आणि त्यावर मात करण्यासाठी सगळ्या संवर्गाणी कामाचे नियोजन कसे करायला हवे याबाबत त्यांनी मार्गदर्शन केले. सरकारच्या फ्लॅगशीप योजना तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आत्मीयतेने काम करा. संस्थात्मक काम करताना ती संस्था स्वत:ची आहे. या भावनेने काम करायला हवे तरच योजनांची फलश्रुती होईल,
ठाणे : अधिकारी-कर्मचा-यांनी कामाच्या बाबतीत कारणे सांगण्यापेक्षा एकजुटीने काम करायला हवे. तरच जिल्ह्याचा शाश्वत विकास होईल. यासाठी तुम्ही करत असलेल्या कामाला दर्जेदार वेळ द्या , कारणे सांगण्यापेक्षा एक जुटीने काम करा या तंबीसह कानमंत्र कोंकण विभागीय आयुक्त डॉ.जगदीश पाटील यांनी ठाणेजिल्हा परिषदेच्या अधिका-यांना दिला. एका कार्यक्र माप्रसंगी आले असता ते बोलत होते.
जिल्हा परिषदेच्या यशवंतराव सभागृहात सन २०१६ - १७ च्या वार्षिक तपासणी टिपणी अहवाल वाचन कार्यक्र माला पाटील उपस्थित होते. त्यांनी जिल्ह्याचा विकास कामांचा आढावा घेतला. यावेळी ग्रामीण भागात योजना राबवताना येणा-या अडचणी कोणत्या आहेत आणि त्यावर मात करण्यासाठी सगळ्या संवर्गाणी कामाचे नियोजन कसे करायला हवे याबाबत त्यांनी मार्गदर्शन केले. सरकारच्या फ्लॅगशीप योजना तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आत्मीयतेने काम करा. संस्थात्मक काम करताना ती संस्था स्वत:ची आहे या भावनेने काम करायला हवे तरच योजनांची फलश्रुती होईल, असेही पाटील यांनी अधिका-यांना जाणीव करून दिली. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक भीमनवार, उप आयुक्त गणेश चौधरी, उप मुख्य कार्यकारी चंद्रकांत पवार उपस्थित होते.
आयुक्तांनी केलेल्या सूचना लक्षात घेवून योग्य ती कार्यवाही करण्याचे आश्वासन भीमनवार यांनी यावेळी दिले. शिवाय जिल्ह्याच्या विकास कामाला गती मिळावी, सरकारी योजनांची काटेकोरपणे अंमलबजावणी व्हावी याकडे गांभीर्याने लक्ष देण्यात येईल. या आढावा बैठकीला प्रकल्प संचालक डॉ. रु पाली सातपुते, कृषी विकास अधिकारी डॉ. प्रफुल बनसोडे, डी. वाय. जाधव, संतोष भोसले, डॉ. मनिष रेंघे, छाया शिसोदे, आर. एम. आडे, मयूर हिंगणे, एल. पवार आदी अधिकारी, कर्मचारी यावेळी उपस्थित होते.