आरोग्य क्षेत्रातील एनक्युएएस पुरस्कारावर जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाची मोहर
By ऑनलाइन लोकमत | Published: April 21, 2018 01:12 PM2018-04-21T13:12:14+5:302018-04-21T13:12:14+5:30
केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या वतीने देण्यात येणारा राष्ट्रीय गुणात्मक आश्वासक मानांकनात (एनक्युएएस) ठाणे जिल्ह्याने बाजी मारली
ठाणे : केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या वतीने देण्यात येणारा राष्ट्रीय गुणात्मक आश्वासक मानांकनात (एनक्युएएस) ठाणे जिल्ह्याने बाजी मारली असून जिल्हयातील धसई, दाभाड आणि दिवांजूर या तीन प्राथमिक आरोग्य केंद्रांना राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. दिल्ली येथे केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री अश्विनी कुमार चौबे यांच्या हस्ते शुक्रवारी हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
ठाणे जिल्ह्याच्या वतीने जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.बी.एस. सोनवणे ,तसेच तालुका अधिकारी डॉ.तरुलता धानके,डॉ.श्रीधर बनसोडे , डॉ.पांडुरंग चौरे,डॉ.योगेश पाटील, डॉ.प्रशांत खरात यांनी हा पुरस्कार स्वीकारला. डॉ. राममनोहर लोहिया रूग्णालयाच्या पीजीआयएमईआर सभागृहात केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या वतीने आयोजित ‘सार्वजनिक आरोग्य क्षेत्रातील गुणवत्ता’ विषयावरील राष्ट्रीय परिषदेत या पुरस्कारांचे वितरण करण्यात आले.