- 24 May,19
05:18 PM
निवडणुकीतील पराभवानंतर काँग्रेसमध्ये राजीनामा पर्व; राहुल गांधीसह सगळेच नेते रांगेत
04:41 PM
Lok Sabha Election 2019 : काय सांगता? तब्बल 39.6 कोटी लोकांचा टिवटिवाट
03:21 PM
लोकसभा निवडणूक निकाल 2019 : देशातील 'स्पेशल 26' निकाल; बड्या नेत्यांना 'जोर का झटका'
02:24 PM
विराेधकांना बसली सणसणीत चापट, पुण्यनगरीचे खासदार गिरीश बापट ; पुण्यात पाेस्टरबाजी
01:50 PM
महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल 2019 : भावना गवळी यांना विजयी प्रमाणपत्र प्रदान
01:40 PM
विजयानंतर नरेंद्र मोदी ज्येष्ठ नेत्यांच्या घरी;अडवाणी, मुरली मनोहर जोशींचे घेतले आशीर्वाद
01:11 PM
महाराष्ट्र लोकसभा निवडणूक Final निकाल 2019 : महाराष्ट्रातील ४८ मतदारसंघांचे Full & Final निकाल एका क्लिकवर
01:04 PM
महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल 2019: माझी स्पर्धा अडसुळांशी नव्हती, मोदींशी होती! - नवनीत राणा
12:57 PM
महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल 2019: युती नको अन् आघाडीही; 'नोटा'ला वाढलेली मतं मनसैनिकांची?
12:37 PM
सोलापूर : माढा लोकसभा मतदार संघात राष्ट्रवादीचे उमेदवार संजय शिंदे यांचा पराभव झाल्याने तरुणाने केला आत्महत्येचा प्रयत्न.
11:48 AM
महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल 2019 : बारामती वाचली, पण शरद पवारांच्या तिसऱ्या पिढीला मतदारांनी नाकारले
10:36 AM
30 मे रोजी नरेंद्र मोदी पंतप्रधानपदाची शपथ घेणार
09:52 AM
महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल 2019: भाजप-सेना युतीने उडविला आघाडीचा धुव्वा
12:44 AM
परभणी लोकसभा मतदारसंघात शिवसेनेचे उमेदवार संजय जाधव हे 42199 च्या मताधिक्याने विजयी झाले आहेत.
- 23 May,19
11:48 PM
ठाणे लोकसभा मतदार संघात 34 व्या टपाल फेरीअखेरीस राजन विचारे 412255 मतांनी आघाडीवर. आनंद परांजपे ( राष्ट्रवादी ) - 329180 मते.
11:18 PM
कल्याण मतदारसंघात २३ व्या फेरीअखेर डॉ श्रीकांत शिंदे (शिवसेना) ३४४८०१ मतांनी आघाडीवर
11:17 PM
वर्धामध्ये युतीचे उमेदवार रामदास तडस यांना 23 फेरीअखेर 1,73,811 मतांची आघाडी मिळाली आहे. काँग्रेसच्या चारुलता टोकस यांना 3 लाख 60 हजार 94 मते मिळाली आहे.
11:13 PM
दिंडोरी मतदारसंघातून भाजपाच्या डॉ. भारती पवार यांनी धनराज महाले यांचा दारूण पराभव करत विजय मिळविला.
11:12 PM
ठाण्यात राजन विचारे 410420 मतांनी आघाडीवर; राष्ट्रवादीचे आनंद परांजपे यांना 327732 मते
10:44 PM
धुळेमध्ये डॉ. सुभाष भामरे 2 लाख 29 हजार 243 मतांनी विजयी; कुणाल पाटील यांना 384290 मते.
10:40 PM
ठाण्यात 32 व्या फेरीअखेर राजन विचारे 4,10,086 मतांनी आघाडीवर
10:31 PM
नांदेडमध्ये काँगेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांचा 40 हजार 10 मतांनी पराभव
10:17 PM
अरुणाचल प्रदेश विधानसभेमध्ये भाजपाचा 23 जागांवर विजय. 7 जागांवर विजयपथावर. काँग्रेसला 3 जागा. एकूण 47 जागा.
10:14 PM
वर्धा लोकसभा मतदारसंघात भाजप शिवसेना युतीचे उमेदवार रामदास तडस 21 व्या फेरीअंती 164824 मतांनी आघाडीवर
10:09 PM
मुंबई उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघात पूनम महाजन यांचा विजय; ४ लाख ८६ हजार ६७३ मते. प्रिया दत्त यांना ३ लाख ५६ हजार ६६७ मते.
10:07 PM
ठाण्यामध्ये 28 फेरीअखेर शिवसेनेचे राजन विचारे 391645 मतांनी आघाडीवर; राष्ट्रवादीच्या आनंद परांजपे यांना 309152 मते.
09:52 PM
गुरुदासपूरमधून अभिनेता सनी देओल यांचा 82,459 मतांनी विजय.
09:49 PM
बुलढाणामध्ये 24 व्या फेरीअखेर शिवसेना उमेदवार प्रतापराव जाधव यांना 508926 मतदान. तर राष्ट्रवादीचे राजेंद्र शिंगणे यांना 3,79,992 मते पडली.
09:15 PM
सुलतानपूर मतदारसंघातून मनेका गांधी यांचा विजय; 13859 मतांची आघाडी
08:55 PM
नितीन गडकरी यांची 205434 आघाडी. नाना पटोले यांना 432171 मते मिळाली.
08:53 PM
अठराव्या फेरीअखेर महाआघाडीच्या नवनीत राणा यांची महायुतीचे आनंदराव अडसूळ यांच्यावर 37295 मतांची आघाडी
08:42 PM
नितीन गडकरी यांनी ओलांडला आघाडीचा 2 लाखांचा टप्पा; अद्याप 50 हजार मताची मोजणी बाकी
08:28 PM
नागपूर मतदारसंघात भाजपाचे नितीन गडकरी यांची 197924 आघाडी. नाना पटोले यांना 420860 मते. एकूण 11,15,683 मतांची मोजणी.
08:24 PM
अमरावतीमध्ये 17 व्या फेरीअखेर नवनीत राणा यांची 21570 मतांची आघाडी
08:12 PM
लोकसभेच्या यवतमाळ-वाशिम मतदारसंघात शिवसेनेच्या भावना गवळी ११३१७५ मतांनी आघाडीवर. गवळी यांना ५२२५२८ तर माणिकराव ठाकरे यांना ४०९३५३ मते.
08:02 PM
हातकणंगले मतदारसंघात 13 व्या फेरीअखेर शिवसेनेचे धैर्यशील माने यांची स्वाभिमान शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी यांच्यावर 83382 मतांची आघाडी
07:57 PM
माजी पंतप्रधान आणि जेडीएसचे प्रमुख एचडी देवेगौडा यांचा तुमकूरमधून 13339 मतांनी पराभव. भाजपाचे जी एस बसवराज यांचा विजय.
07:47 PM
गेल्या 50 वर्षांत पहिल्यांदाच संपूर्ण बहुमतातील सलग दुसऱ्यांदा सरकार आले आहे.
07:44 PM
दिल्ली लोकसभा निवडणूक निकाल 2019: भाजपाची जोरदार मुसंडी, सातही जागांवर आघाडी
07:19 PM
राष्ट्रवादीचे सुनील तटकरे 31438 मतांनी विजयी. शिवसेनेचे अनंत गीते यांचा पराभव. तटकरे यांना 486968 मते तर गीते यांनी 455530 मिळाली.
07:16 PM
रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदार संघात पंचविसाव्या फेरीनंतर शिवसेनेच्या विनायक राऊत यांची स्वाभिमान पक्षाच्या नीलेश राणे यांच्यावर १ लाख ७६ हजार ८१४ मतांची आघाडी.
07:13 PM
अमरावती मतदारसंघात 1७ व्या फेरीअखेर राष्ट्रवादीच्या नवनीत राणा यांची शिवसेनेच्या आनंदराव अडसूळ यांच्यावर 457585 मतांची आघाडी.
07:12 PM
रामटेक मतदारसंघात 12 व्या फेरीअखेर शिवसेनेचे कृपाल तुमाने यांची काँग्रेसच्या किशोर गजभिये यांच्यावर 60558 मतांची आघाडी.
07:10 PM
नागपूर मतदारसंघात 11 व्या फेरीअखेर भाजपचे नितीन गडकरी यांची काँग्रेसच्या नाना पटोले यांच्यावर ११८७६४ मतांची आघाडी.
07:04 PM
लोकसभा निकालांचा विधानसभेवर प्रभाव दिसणार नाही, पराभवाची नैतिक जबाबदारी स्वीकारतो - अशोक चव्हाण
06:59 PM
बाबुल सुप्रियोंनी पुन्हा मारली बाजी, मूनमून सेन यांना पराभवाचा धक्का
06:59 PM
लोकसभा निवडणूक निकाल 2019 : पूर्वोत्तर भारतातही भाजपाची मुसंडी, 14 जागांवर घेतली आघाडी
06:48 PM
राहुल गांधी यांच्या राजीनाम्याचा प्रस्तावाचे वृत्त खोटे
06:44 PM
अमरावती : महाआघाडीच्या नवनीत राणा यांची महायुतीचे आनंदराव अडसूळ यांच्यावर 43313 मतांची आघाडी
06:42 PM
Maharashtra Lok Sabha Election Results 2019: 'लावा रे ते फटाके'; उद्धव'दादू'चा 'राजा'ला त्याच्याच शैलीत टोमणा
06:35 PM
औरंगाबाद : खैरे आणि जलील समर्थकांची मतमोजणी केंद्राबाहेर दगडफेक.
06:31 PM
प्रकाश आंबेडकर यांना सोलापूर लोकसभा मतदार संघात 1 लाख 60 हजार 736 मतं मिळाली आहेत.
06:27 PM
महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल 2019: शिवसेनेच्या यशानं उद्धव ठाकरे ठरले राजकारणातील 'चाणक्य'
06:23 PM
नंदुरबार : राज्यात लोकसभेचा पहिल्या क्रमांकाचा असलेल्या नंदुरबार मतदारसंघ निकालाचा बाबतीतही आघाडीवर असून राज्यातील पहिला निकाल जाहीर करण्याचा मानही नंदुरबारला मिळाला आहे.
06:21 PM
अकोला लोकसभा निवडणूक निकाल 2019: संजय धोत्रेंना २ लाख ६८ हजार ४६२ मतांची निर्णायक आघाडी
06:16 PM
प्रियंका गांधी यांनी जनतेचे आभार मानत भाजपाचे अभिनंदन केले
06:12 PM
मुलानं घेतला आईच्या पराभवाचा बदला; राजू शेट्टींचा पराभव करत धैर्यशील माने 'जायंट किलर'
06:07 PM
Lok Sabha Election Result 2019: शरद पवार हरले नगरचा '(रण)संग्राम', हाती आले धुपाटणे!
05:51 PM
राहुल गांधी यांची पत्रकार परिषद सुरू
05:43 PM
Lok Sabha Election 2019: राज ठाकरेंची 'एका शब्दात' प्रतिक्रिया; काय म्हणाले पाहा!
05:38 PM
पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी केले मोदींचे अभिनंदन
05:35 PM
नंदुरबार लोकसभा मतदारसंघातून भाजपा उमेदवार डाॅ. हिना गावित 95,296 मतांनी विजयी झाल्याचे घोषित करण्यात आले.
05:26 PM
भाजपाच्या प्रज्ञा सिंग ठाकूर आघाडीवर
05:24 PM
अभिनेता सनी देओलने गुरदासपूरमध्ये आपल्या समर्थकांची भेट घेतली
05:21 PM
महाआघाडीच्या नवनीत राणा यांची महायुतीचे आनंदराव अडसूळ यांच्यावर 39745 मतांची आघाडी
05:18 PM
Lok Sabha Election 2019: 14 राज्यं काँग्रेसमुक्त; बघा कुठे कुठे मिळाला काँग्रेसला भोपळा
05:15 PM
Lok sabha Election Result 2019: दस का दम!... देशात पुन्हा मोदीलाट उसळण्यामागची १० 'ओपन सिक्रेट'
05:14 PM
Lok Sabha Election 2019 : रक्षा खडसेंचा विजय निश्चित, 20 व्या फेरीनंतर लाखोंचे मताधिक्य
05:11 PM
Lok Sabha Election 2019 : चांगलीच मिळाली चपराक, निवडणुकीतील पराभवानंतर प्रकाश राज यांनी केले ट्विट
05:01 PM
Lok Sabha Election 2019 Result: गौतम गंभीर, राज्यवर्धन राठोड विजयाच्या उंबरठ्यावर; काँग्रेसचे तीनही खेळाडू बाद
04:58 PM
आमदार जयंत पाटील यांच्याकडून पत्रकारास मारहाण
04:55 PM
रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघात विसाव्या फेरीनंतर शिवसेनेच्या विनायक राऊत यांची स्वाभिमान पक्षाच्या नीलेश नारायण राणे यांच्यावर १ लाख ५१ हजार ३७७ मतांची आघाडी. गतवेळेपेक्षा आघाडी वाढली.
04:52 PM
अकोला लोकसभा मतदारसंघाचे भाजपचे संजय धोत्रे यांची सर्वाधिक मताधिक्याकडे वाटचाल; आतापर्यंत २६३७२१ मतांची आघाडी.
04:48 PM
दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघात शिवसेनेचे राहुल शेवाळे यांनी आघाडी घेतली आहे.
04:44 PM
वायनाड लोकसभा मतदारसंघातून काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी 8 लाख 38 हजार 371
04:43 PM
अकोला लोकसभा मतदारसंघात बाविसाव्या फेरीअखेर भाजपचे संजय धोत्रे हे ४ लाख ७८ हजार ३७८ मतं घेऊन आघाडीवर आहेत.
04:40 PM
Bihar Loksabha Election Result 2019: बिहारच्या जनतेने दिला मोदी-नितीश कुमारांना कौल; एनडीएला मिळाल्या 30 पेक्षा अधिक जागा
04:34 PM
हातकणंगले लोकसभा मतदार संघात शिवसेनेचे धैर्यशील माने हे आतापर्यंत मोजलेल्या मतांमध्ये 90194 मतांनी आघाडीवर
04:33 PM
ओडिशा लोकसभा निवडणूक निकाल 2019 : ओडिशात 'बीजेडी' ची विजयाच्या दिशेने वाटचाल
04:30 PM
रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघात अठराव्या फेरीनंतर शिवसेनेच्या विनायक राऊत यांची स्वाभिमान पक्षाच्या नीलेश नारायण राणे यांच्यावर १ लाख ३८ हजार १८१ मतांची आघाडी.
04:27 PM
गुलबर्गा लोकसभा मतदारसंघातील मतदारांनी दिलेला कौल मान्य, मल्लिकार्जुन खर्गे यांची प्रतिक्रिया
04:25 PM
Lok Sabha Election 2019 : माजी पंतप्रधान एचडी देवेगौडा पराभवाच्या छायेत
04:20 PM
नरेंद्र मोदींनी केले जगनमोहन रेड्डी आणि नवीन पटनाईक यांचे अभिनंदन
04:16 PM
पुण्यात निकालाला लागणार विलंब.. मतमोजणीत घोळच जास्त..
04:12 PM
हरयाणात मोदी लाटेचा तडाखा, भाजपाला सर्वच जागांवर आघाडी
04:07 PM
भाजपाध्यक्ष अमित शहा यांचे भाजपा मुख्यालयात जोरदार स्वागत
04:02 PM
लोकसभा निवडणूक निकाल 2019: मनसेवर शरद पवारांचे मोठं विधान, राज ठाकरेंबाबत पवार अजूनही आशावादी
03:59 PM
लालकृष्ण अडवाणींनी केले नरेंद्र मोदी आणि अमित शहांचे अभिनंदन
03:57 PM
लोकसभा निवडणूक निकाल 2019 : सबका साथ, सबका विकास, मोदींनी व्यक्त केला विजयी भारतावर विश्वास
03:56 PM
अफगाणिस्तानचे राष्ट्रपती अश्रफ घनी यांनी केले नरेंद्र मोदींचे अभिनंदन
03:54 PM
रत्नागिरी: स्वाभिमान हा पक्ष नाही, ती स्वार्थासाठीची कौटुंबिक संघटना आहे, अशी टीका रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघातून शिवसेनेचे उमेदवार विनायक राऊत यांनी स्वाभिमान पक्षावर केली आहे.
03:36 PM
अकाली दलाच्या नेत्या आणि केंद्रीय मंत्री हरसिम्रत कौर भटिंडा मतदारसंघातून आघाडीवर
03:22 PM
चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग यांनी केले नरेंद्र मोदींचे अभिनंदन
03:01 PM
ईशान्य मुंबई लोकसभा निवडणूक निकाल 2019: किरीट सोमय्यांचा कापला पत्ता, कोटक ठरले हुकमी एक्का
02:59 PM
शिरूर लोकसभा निवडणूक निकाल २०१९ : शिरुरमध्ये अमोल कोल्हे विजयाच्या उंबरठ्यावर
02:53 PM
लोकसभा निवडणूक निकाल 2019: मोदींच्या अभूतपूर्व यशाची ही 5 प्रमुख कारणे!
02:50 PM
Begusarai Lok Sabha Election Result 2019: संपूर्ण देशाचे लक्ष लागलेल्या बेगुसरायमध्ये धक्कादायक निकाल लागण्याची शक्यता
02:49 PM
रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात चौदाव्या फेरीनंतर शिवसेनेच्या विनायक राऊत यांची स्वाभिमान पक्षाच्या नीलेश नारायण राणे यांच्यावर १ लाख ११ हजार ६१२ मतांची आघाडी.
02:45 PM
West Bengal Election Results 2019 : पश्चिम बंगालमध्ये भाजपा ममतांचा गड पोखरणार?
02:41 PM
वायनाडमध्ये राहुल गांधींचा दणदणीत विजय, अधिकृत घोषणा बाकी
02:39 PM
दिल्ली लोकसभा निवडणूक निकाल 2019: सातही जागांवर भाजपाला आघाडी
02:31 PM
भाऊबंदकीच्या लढतीत कोण बाजी मारणार? ओमप्रकाश राजेनिंबाळकर आघाडीवर
02:23 PM
रायगड लोकसभा मतदार संघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेवार सुनील तटकरे विजयाच्या उंबरठ्यावर
02:06 PM
अमरावती लोकसभा मतदारसंघातून महाआघाडीच्या नवनीत राणा यांची महायुतीचे आनंदराव अडसूळ यांच्यावर 9858 मतांची आघाडी घेतली आहे.
01:39 PM
लोकसभेच्या नांदेड मतदारसंघात आतापर्यंत बारा फेऱ्याअंती साडे पाच लाख मतांची मोजणी पार पडली. आणखी साडे पाच लाख मतांची मोजणी बाकी आहे. मतमोजणीच्या एकूण 24 फेऱ्या होणार आहेत.
01:38 PM
नंदुरबार लोकसभा मतदारसंघातून भाजपा उमेदवार हिना गावित जवळपास सत्तर हजारापेक्षा अधिक मतांनी विजयी.
01:31 PM
उत्तर प्रदेश, बंगाल आणि ओडिशामध्ये भाजपाची मुसंडी
01:02 PM
नांदेड लोकसभा मतदार संघात अशोकराव चव्हाण 19 हजार 503 मतांनी पिछाडीवर
12:59 PM
अमरावती लोकसभा महायुतीचे आनंदराव अडसूळ बडनेरा, अमरावती, तिवसा, अमरावती विधानसभा मतदारसंघात आघाडीवर, महाआघाडीच्या नवनीत राणा दर्यापूर व मेळ्घाट मतदारसंघात आघाडीवर
12:55 PM
भाजपा नेते बाबूल सुप्रियो आसनसोल मतदारसंघातून आघाडीवर
12:49 PM
रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघात नवव्या फेरीनंतर शिवसेनेच्या विनायक राऊत यांची स्वाभिमान पक्षाच्या नीलेश नारायण राणे यांच्यावर ७० हजार मतांची आघाडी.
12:47 PM
बीड लोकसभा मतदारसंघात अकराव्या फेरीअखेर भाजपा प्रीतम मुंडे 51000 मतांनी आघाडीवर
12:40 PM
अकोला लोकसभा मतदार संघात सातव्या फेरीअखेर भाजपचे संजय धोत्रे यांनी प्रकाश आंबेडकर यांच्यावर ५८९४० मतांनी आघाडी घेतली आहे.
12:37 PM
भाजपाच्या संसदीय मंडळाची आज संध्याकाळी 5 वाजता बैठक
12:34 PM
Lok Sabha Election 2019 Result : पूर्वोत्तर भारतात कमळ उमलणार?
12:31 PM
आघाडी मिळाल्यानंतर भाजपाच्या पश्चिम बंगाल कार्यालयाबाहेर कार्यकर्त्यांचा जल्लोष
12:28 PM
Lok sabha election results 2019: राज ठाकरेंनी सभा घेतल्या, तिथे शिवसेना-भाजपाचं काय झालं? जाणून घ्या
12:22 PM
कल्याण लोकसभा निवडणूक निकाल 2019: शिवसेनेची 'शिंदे'शाही जोमात, विरोधक कोमात
12:18 PM
Lok Sabha Election 2019 : पंतप्रधानपदाची महत्त्वाकांक्षा ठेवणारे चंद्राबाबू मुख्यमंत्रीपदही गमावणार ?
12:10 PM
मुंबई : शिवसेना भवनबाहेर फटाक्यांची आतषबाजी सुरू
12:03 PM
उत्तर मध्य मुंबई लोकसभा निकाल 2019: पूनम महाजनांना आघाडी; प्रिया दत्त 42 हजार मतांनी पिछाडीवर
12:00 PM
मावळ लोकसभा निकाल २०१९ : पार्थ पवार संकटात : श्रीरंग बारणे एक लाखांनी आघाडीवर
11:59 AM
भाजपा नेते जय पांडा ओडिशामधील केंद्रापाडा मतदारसंघातून दोन हजार मतांनी पिछाडीवर
11:57 AM
केंद्रीय मंत्री मनोज सिन्हा आणि मनेका गांधी पिछाडीवर
11:52 AM
लोकसभेच्या यवतमाळ-वाशिम मतदारसंघात शिवसेनेच्या भावना गवळी १३७७७ मतांनी आघाडीवर. काँग्रेसचे माणिकराव ठाकरे पिछाडीवर.
11:50 AM
हैदराबादमध्ये असुदूद्दीन औवेसींना भाजपा उमेदवार देतोय 'कांटे की टक्कर'
11:49 AM
मुंबई दक्षिण लोकसभा निवडणूक निकाल 2019: पुन्हा शिवसेनेचं वर्चस्व? मनसे फॅक्टर अयशस्वी
11:44 AM
अमेठीमध्ये स्मृती इराणी 7 हजार 600 मतांनी आघाडीवर
11:40 AM
भंडारा गोंदिया लोकसभा मतदारसंघात भाजपाचे सुनील मेंढे 26219 मतांनी आघाडीवर.
11:38 AM
लातूर लोकसभा मतदारसंघात दहाव्या फेरीअखेर भाजपचे उमेदवार सुधाकर शृंगारे हे 43 हजार 24 मतांनी आघाडीवर
11:01 AM
लातूर लोकसभा मतदारसंघात पाचव्या फेरीअखेर भाजपाचे उमेदवार सुधाकर शृंगारे हे 31 हजार 681 मतांनी आघाडीवर आहेत.
11:29 AM
लोकसभेच्या यवतमाळ-वाशिम मतदारसंघात शिवसेनेच्या भावना गवळी १५५६१ मतांनी आघाडीवर. काँग्रेसचे माणिकराव ठाकरे पिछाडीवर. गवळी यांना ७८६२७ तर माणिकराव ठाकरे यांना ६३०६६ मते.
11:26 AM
काँग्रेस नेते शशी थरूर 13 हजार मतांनी आघाडीवर
11:24 AM
पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेस 24 तर भाजपा 17 जागांवर आघाडीवर
11:23 AM
रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघात शिवसेनेचे उमेदवार विनायक राऊत यांना पाचव्या फेरीनंतर ३८ हजारांची आघाडी.
11:20 AM
वाराणसी लोकसभा मतदारसंघातून पंतप्रधान नरेंद्र मोदी 92 हजार 999 मतांनी आघाडीवर
11:13 AM
जम्मू लोकसभा मतदारसंघात भाजपाचे जुगलकिशोर शर्मा आघाडी
11:12 AM
लोकसभेच्या यवतमाळ-वाशिम मतदारसंघात शिवसेनेच्या भावना गवळी १३९८२ मतांनी आघाडीवर. काँग्रेसचे माणिकराव ठाकरे पिछाडीवर. गवळी यांना ७४८८५ तर माणिकराव ठाकरे यांना ६०९०३ मते.
11:10 AM
गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघातील भाजपचे अशोक नेते हे काँग्रेसचे डॉ. नामदेव उसेंडी यांच्यापेक्षा 20 हजार मतांनी आघाडीवर आहेत.
11:05 AM
लोकसभेच्या यवतमाळ-वाशिम मतदारसंघात बाराव्या फेरी अखेर शिवसेनेच्या भावना गवळी १२७६१ मतांनी आघाडीवर. काँग्रेसचे माणिकराव ठाकरे पिछाडीवर.
10:59 AM
ज्येष्ठ नेते शरद यादव मधेपूरा मतदारसंघातून पिछाडीवर
10:57 AM
भाजपाध्यक्ष अमित शहा गांधीनगर मतदारसंघातून सव्वालाख मतांनी आघाडीवर
10:54 AM
उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघात शिवसेनेचे गजानन कीर्तिकर यांना पहिल्या फेरीअखेर एकूण 26138 मते मिळाली तर काँग्रेस आघाडीचे उमेदवार संजय निरुपम यांना 13761 मते मिळाली.
10:50 AM
शेअर बाजारात मोठी उसळी, सेंसेक्स 40 हजारांच्या पार
10:47 AM
अमरावती लोकसभा मतदारसंघ मतमोजणीची पहिल्या फेरीनंतर महायुतीचे उमेदवार (शिवसेना) आनंदराव अडसूळ यांना ६७३४० मते, महाआघाडीच्या उमेदवार नवनीत राणा यांना ६३१०९ मते, आनंदराव अडसूळ ४२३१ मतांनी आघाडीवर.
10:45 AM
ठाणे लोकसभा मतदारसंघात शिवसेनेचे राजन विचारे यांनी दसऱ्या फेरीत 16824 मतांनी आघाडी घेतली आहे.
10:43 AM
पंजाब लोकसभा निवडणूक निकाल 2019: पंजाबमध्ये कोण करेल भांगडा? अकाली, 'आप'शी काँग्रेसचा सामना
10:39 AM
शिवगंगा लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसचे कार्ती चिदंबरम आघाडीवर
10:38 AM
पालघरमध्ये शिवसेनेच्या राजेंद्र गावितांना एकूण 2 लाख 93 हजार 417 मते तर बहुजन विकास आघाडीच्या बळीराम जाधव यांना 2 लाख 93 हजार 761 मते मिळाली.
10:37 AM
दिल्लीतील सातही लोकसभा मतदारसंघात भाजपाला आघाडी
10:37 AM
राजस्थान लोकसभा निवडणूक निकाल 2019: भाजपाला तब्बल 24 जागांवर आघाडी
10:36 AM
कोल्हापूरमध्ये शिवसेनेचे संजय मंडलिक यांनी विद्यमान खासदार राष्ट्रवादीचे धनंजय महाडिक यांच्यावर तिसऱ्या फेरीअखेर तब्बल ४५ हजार मतांची आघाडी घेत राष्ट्रवादीला मोठा धक्का दिला आहे.
10:32 AM
शरद पवारांच्या कन्या सुप्रिया सुळे, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ, कॉलर उडविण्यासाठी प्रसिद्ध असलेले साताराचे राजे उदयनराजे भोसले हे राष्ट्रवादीचे दिग्गज उमेदवार ८ ते १५ हजार मतांनी मागे पडले आहेत.
10:20 AM
निवडणूक आयोगांच्या कलांनुसार भाजपा 229 तर काँग्रेस 56 जागांवर आघाडीवर
10:15 AM
वाराणसीमध्ये नरेंद्र मोदी 11 हजार 236 मतांनी आघाडीवर
10:03 AM
नंदुरबार : काँग्रेसचे के.सी. पाडवी 11 हजार मतांनी आघाडीवर
10:02 AM
भाजपाचे युवा नेते तेजस्वी सूर्या दक्षिण बंगळुरू मतदारसंघातून आघाडीवर
09:58 AM
Lok Sabha Election Results 2019: ...म्हणून यंदा 543 नव्हे, तर 542 जागांचे निकाल जाहीर होणार
09:55 AM
उत्तर प्रदेश : सुलतानपूर लोकसभा मतदारसंघातून भाजपाच्या मनेका गांधी आघाडीवर
09:52 AM
लोकसभेच्या यवतमाळ-वाशिम मतदारसंघात दुसऱ्या फेरीअखेर शिवसेनेच्या भावना गवळी तीन हजार २७४ मतांनी आघाडीवर. भावना गवळी यांना २० हजार ६५२ तर काँग्रेसचे माणिकराव ठाकरे यांना १७ हजार ३७८ मते.
09:51 AM
मतमोजणीच्या सुरुवातीच्या कलांनंतर शेअर बाजार वधारला, सेंसेक्स 600 अंकांनी वधारला
09:50 AM
उत्तर पूर्व मुंबई लोकसभा मतदारसंघातून मनोज कोटक ६४ हजार १६९ मतं, तर संजय पाटील ४७ हजार ३१७ मतं; मतमोजणी अद्याप सुरू.
09:47 AM
नंदुरबारमध्ये हिना गावित पिछाडीवर, विदर्भात काँग्रेसला अच्छे दिन येणार ?
09:43 AM
ठाणे लोकसभेच्या शिवसेनेचे उमेदवार राजन विचारे यांना ओवळा माजिवडा 3353, कोपरी पाचपाखाडी 2954, ठाणे 3434, ऐरोली 1849 बेलापूर 1745 मते तर मिराभाईंदरला राष्ट्रवादीचे आनंद परांजपे मतांनी 760 मतांनी आघाडीवर आहेत.
09:41 AM
निवडणूक आयोगाच्या अधिकृत आकडेवारीनुसार भाजपाला 162 तर काँग्रेसला 51 जागांवर आघाडीवर
09:40 AM
दिंडोरीमध्ये शिवसेनेतून राष्ट्रवादीत उडी घेऊन घड्याळावर लढत असलेले धनराज महाले पुढे आहेत. तिथे भाजपने डॉ.भारती पवार यांना राष्ट्रवादीतून भाजपात आणून त्यांच्या हाती कमळ दिले आहे.
09:38 AM
बेगुसरायमध्ये भाजपाचे गिरिराज सिंह आघाडीवर, कन्हैया कुमार पिछाडीवर
09:37 AM
शिरुरमध्ये शिवसेनेचे प्रस्थापित नेते आणि खासदार शिवाजीराव अढ्याळराव पाटील पिछाडीवर
09:36 AM
West Bengal Lok Sabha Election Results 2019 : पश्चिम बंगालमध्ये दीदींच्या गडाला भाजपा सुरुंग लावणार का?
09:34 AM
हिना गावित पिछाडीवर असणे हा भाजपासाठी मोठा धक्का
09:31 AM
Rajasthan Lok Sabha Election Results 2019: भाजपा वर्चस्व राखणार की काँग्रेस बाजी मारणार?
09:30 AM
केरळ : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शशी थरूर तिरुवनंतपुरम मतदारसंघातून आघाडीवर
09:27 AM
उत्तर पूर्व मुंबई लोकसभा मतदारसंघातून भाजपाचे उमेदवार मनोज कोटक आघाडीवर आहेत.
09:25 AM
निवडणूक आयोगाच्या अधिकृत कलांनुसार भाजपा 133 तर काँग्रेस 41 जागांवर आघाडीवर
09:23 AM
सातारा लोकसभा मतदासंघात पोस्टल मतदानात राष्ट्रवादी काँग्रेसचे उदयनराजे भोसले आघाडीवर
09:21 AM
सोनिया गांधी रायबरेली तर राहुल गांधी वायनाड मतदारसंघातून आघाडीवर
09:20 AM
हातकणंगले लोकसभा मतदारसंघात राजपत्रित अधिकारी यांची स्वाक्षरी नसल्याने पहिली सहा टपाली मते रद्द
09:18 AM
काँग्रेस नेते ज्योतिरादित्य शिंदे मध्य प्रदेशमधील गुणा मतदारसंघातून पिछाडीवर
09:15 AM
कोल्हापूर मतदारसंघातून शिवसेनेचे संजय मंडलिक 14656 ने आघाडीवर
09:13 AM
भाजपा नेते अनुराग ठाकूर हमीरपूर लोकसभा मतदारसंघातून आघाडीवर
09:08 AM
चंदिगड : चंदिगड लोकसभा मतदारसंघातून भाजपाच्या किरण खेर आघाडीवर
09:06 AM
निवडणूक आयोगाच्या अधिकृत आकडेवारीनुसार भाजपा 9 आणि काँग्रेस 3 जागांवर आघाडीवर
09:03 AM
सोलापूर लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसचे सुशीलकुमार शिंदे तर माढा लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादीचे संजय शिंदे आघाडीवर, वंचित बहुजन आघाडीने अद्याप खाते उघडले नाही.
09:02 AM
अमेठी : अमेठीमध्ये स्मृती इराणी आघाडीवर, राहुल गांधी पिछाडीवर
08:59 AM
नांदेडमध्ये काँग्रेसचे उमेदवार अशोक चव्हाण आघाडीवर आहेत
08:58 AM
Delhi Lok Sabha Election Results 2019 : दिल्लीत भाजपाचा पुन्हा झेंडा फडकणार?
08:55 AM
रायगड लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादीचे उमेदवार सुनील तटकरे आघाडीवर आहेत.
08:54 AM
ठाणे लोकसभा मतदार संघात अद्याप मतमोजणीला सुरुवात नाही.
08:51 AM
वाराणसी : वाराणसी लोकसभा मतदारसंघातून पंतप्रधान नरेंद्र मोदी आघाडीवर
08:50 AM
अहमदनगर लोकसभा निवडणूक निकाल 2019: पहिल्या फेरीत डॉ.सुजय विखे १२ हजार मताने आघाडीवर
08:48 AM
Tamil Nadu Lok Sabha Election 2019 Result : तामिळनाडूत AIADMK आणि DMK यांच्यात चुरस पाहायला मिळणार
08:47 AM
महाराष्ट्रात या चार ठिकाणी लागणार सर्वात आधी निकाल
08:41 AM
कर्नाटकातून काँग्रेस उमेदवार मल्लिकार्जुन खर्गे पिछाडीवर
08:38 AM
गांधीनगर : भाजपाध्यक्ष अमित शहा 25 हजार मतांनी आघाडीवर
08:37 AM
भोपाळ : सुरुवातीच्या कलांमध्ये भोपाळलोकसभा मतदारसंघामध्ये प्रज्ञा सिंह आघाडीवर, दिग्विजय सिंह पिछाडीवर
08:36 AM
मध्य प्रदेश लोकसभा निवडणूक निकाल 2019: मध्य प्रदेशात कमळ फुलणार की कोमेजणार? वाढलेलं मतदान कोणाला हात देणार?
08:34 AM
लोकसभा निवडणुकीचे मतमोजणीच्या प्राथमिक कल हाती आले असून, सुरुवातीच्या कलांमध्ये एनडीए 22, यूपीए 15 आणि इतर 3 जागांवर आघाडीवर
08:32 AM
Karnataka Lok Sabha Election Results 2019 : कर्नाटक 'कमळा'ला पावणार की पुन्हा पडत्या काळात काँग्रेसला तारणार?
08:31 AM
Maharashtra Lok Sabha Election Results 2019: महाराष्ट्रात कोण गेलं पुढे?, कोण पडलं मागे?
08:21 AM
अकोला लोकसभा मतदार संघाची मतमोजणी सुरू
08:21 AM
औरंगाबाद : लोकसभा मतदारसंघासाठी पोस्टल मतांची मोजणी सुरू.
08:20 AM
Uttar Pradesh Lok Sabha Election 2019 Result : उत्तर प्रदेशात कमल फुलणार की महाआघाडी मुसंडी मारणार?
08:14 AM
मी निकालाबाबत निश्चिंत - रविशंकर प्रसाद
08:11 AM
पिंपरीत अमोल कोल्हे खासदार झाल्याचे फ्लेक्स कार्यकर्त्यांनी झळकवले
08:08 AM
लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात
08:06 AM
कल्याणमध्ये मतमोजणीपूर्वीच भाजपाची बॅनरबाजी, युतीचे उमेदवार श्रीकांत शिंदेंच्या विजयाचे बॅनर
08:02 AM
सोलापूर : सोलापूर व माढा मतदारसंघातील मतमोजणीला थोड्याच वेळात होणार सुरुवात, प्रशासकीय यंत्रणा सज्ज
07:56 AM
शिर्डी : नगर दक्षिणचे भाजपासेना युतीचे उमेदवार डॉ. सुजय विखे यांच्या यशासाठी त्यांच्या मातोश्री व जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शालिनीताई विखे पाटील आज पहाटे लोणीवरून शिर्डीसाठी साईंच्या दर्शनासाठी पायी जात आहेत.
07:53 AM
Lok Sabha Election 2019 Result: साताऱ्यात उदयनराजे फॅक्टर पुन्हा चालणार की शिवसेना गड भेदणार?
07:46 AM
बंगळुरू भाजपाचे युवा उमेदवार तेजस्वी सूर्या यांनी व्यक्त केला विजयाचा विश्वास
07:46 AM
आसाममध्ये निवडणूक मतमोजणीची तयारी पूर्ण
07:45 AM
जालना : भाजपा प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांचं कुटुंबीयांकडून औक्षण
07:44 AM
बंगळुरू - नरेंद्र मोदीच बनणार पुढचे पंतप्रधान, कलबुर्गी येथील भाजपा उमेदवार उमेश जाधव यांना विश्वास
07:42 AM
मतमोजणीची प्रक्रिया सुव्यवस्थितपणे पार पडावी यासाठी निवडणूक आयोगाने जय्यत तयारी केली आहे.
07:41 AM
मुंबई : राज्यातील 48 लोकसभा मतदारसंघातील निवडणुकांचे निकाल आज जाहीर होणार आहे. यासाठी सकाळी 8 वाजेपासून मतमोजणीला सुरुवात होणार असून अनेक दिग्गज नेत्यांचे भवितव्य आज ठरणार आहे.
07:39 AM
मतमोजणी आधीच दिल्लीत भाजपा कार्यालयाबाहेर ढोल-ताशांचा गजर
07:37 AM
दिल्ली : काँग्रेसच्याच बाजूने निकाल लागेल आणि सत्ता स्थापन करेल. राहुल गांधी पंतप्रधान होतील. दिल्लीतील प्रमुख लढत भाजप आणि काँग्रेसमध्ये आहे - काँग्रेस उमेदवार अजय माकन
07:32 AM
बारामतीतून भाजपा उमेदवार कांचन कुल निवडणूक निकालापूर्वी सारसबागेत गणपतीच्या दर्शनाला
07:29 AM
मध्य प्रदेश : भोपाळमध्ये मतमोजणी केंद्राबाहेर कडक सुरक्षा व्यवस्था तैनात. सकाळी 8 वाजता मतमोजणीला सुरुवात होणार.
07:29 AM
Bihar Lok Sabha Election 2019 Result: बिहारच्या जनतेचा कौल कुणाला?
07:27 AM
जळगाव : लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीची तयारी पूर्ण झाली असून जिल्हा प्रशासन यासाठी सज्ज झाले आहे.
07:25 AM
राज्यात लागणार धक्कादायक निकाल?
07:23 AM
Lok Sabha Election 2019 Result: सकाळी 8 वाजता मतमोजणीला सुरुवात होणार.
07:22 AM
आज लोकसभा निवडणुकीचा निकाल, देशभरात कडक सुरक्षा व्यवस्था तैनात.
07:20 AM
पुन्हा मोदी की सत्तापालट?