उन्हाळ्याच्या सुट्टीत या अॅम्युझमेंट पार्कला भेट देऊन करा धमाल-मस्ती
By ऑनलाइन लोकमत | Published: April 28, 2018 01:39 PM2018-04-28T13:39:40+5:302018-04-28T13:39:40+5:30
जर तुमच्याकडे आठवड्याभराची सुट्टी नसेल आणि केवळ विकेन्ड असेल तर तुमच्यासाठी देशातील काही खास अॅम्युझमेंट पार्कची माहिती आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत.
उन्हाळ्याची सुट्टी म्हटलं की, धमाल, मजा, मस्ती आणि अॅडव्हेंचर असं सगळं डोळ्यांसमोर येतं. बहुदा लोक उन्हाळ्यात थंड ठिकाणी जाण्या प्राधान्य देतात आणि आठवडाभराची सुट्टी तिकडे घालवून येतात. पण जर तुमच्याकडे आठवड्याभराची सुट्टी नसेल आणि केवळ विकेन्ड असेल तर तुमच्यासाठी देशातील काही खास अॅम्युझमेंट पार्कची माहिती आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. अॅम्युझमेंट पार्कमध्ये तुम्ही सुट्टीचा मनमुराद आनंद घेऊ शकता.
1) वंडरला, बेंगळुरू
अॅम्युझमेंट पार्कच्या या यादीत सर्वातआधी येतं ते बेंगळुरूतील वंडरला या पार्कचं. सर्वात जास्त वेगवेगळ्या प्रकारच्या राईड्स इथे तुम्हाला एन्जॉय करता येईल. महत्वाची बाब म्हणजे इथे तुम्ही हवेसोबतच पाण्यातही मजा करु शकता. हा पार्क बेंगळुरुपासून 27 किमी अंतरावर बिदडीजवळ आहे. हा मनोरंजन पार्क तब्बल 82 एकर परीसरात पसरलेला आहे.
तिकीट - 700 ते 1000 रुपये प्रतिव्यक्ति
2) एस्सेल वर्ल्ड, मुंबई
मुंबईत तर तशा फिरण्यासाठी अनेक जागा आहेत. पण उन्हाळ्यात पाण्यात धमाल-मस्ती करायची असेल तर एस्सेल वर्ल्ड हे परफेक्ट ठिकाण आहे. बदलत्या काळानुसार इथे अनेक नव्या गोष्टींची सोय करण्यात आली आहे. लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळेच इथे सुट्टीचा आनंद घेऊ शकतात.
तिकीट - 500 ते 700 रुपये
3) निको पार्क, कोलकाता
निको पार्क हा देशातील सर्वात चांगल्या पार्कपैकी एक आहे. हा पार्क 1991 मध्ये तयार करण्यात आला होता. हा पार्क 40 एकर परीसरात तयार करण्यात आला आहे. या पार्कमध्ये सर्वच वयोगटातील लोकांसाठी जवळपास 35 राईड्स आहेत.
तिकीट - 450 रुपये
4) किंगडम ऑफ ड्रीम्स, गुडगांव
किंगडम ऑफ ड्रीम्स हे भारतातील पहिलं लाईव्ह एन्टरटेन्मेंट पार्क आहे. इथे मनोरंजनासोबतच लोकांना खूपकाही नवीन बघायला मिळेल. येथील सर्वात हायटेक ऑडिटोरियमचं नाव नौटंकी महल असं आहे. परदेशातील पर्यटकही इथे मोठ्या प्रमाणात येतात.
तिकीट - 1200 ते 3500 रुपये
5) रामोजी फिल्म सिटी, हैदराबाद
रामोजी फिल्म सिटी हे हैदराबाजच्या बाहेर वसवण्यात आली आहे. इथे केवळ मालिका आणि सिनेमांचं शूटिंगच नाहीतर पिकनिक, थीम पार्क, कॉर्पोरेट इव्हेंट, लग्न समारंभ, अॅडव्हेंचर कॅम्प, हनीमूनसाठीही लोक येतात. रामोजी फिल्स सिटी हा जगातला सर्वात मोठा स्टुडिओ आहे.
तिकीट - 700 ते 800 रुपये