जगभरातल्या पर्यटकांची पसंती ताजमहाललाच. जगातील भव्य दिव्य दहा वास्तूंच्या यादीमध्ये भारतातला ताजमहाल पाचव्या क्रमांकावर.
By admin | Published: June 7, 2017 06:12 PM2017-06-07T18:12:11+5:302017-06-07T18:12:11+5:30
प्रेमाचं प्रतीक म्हणून ओळखला जाणारा ताजमहाल Travellers’ Choice awards for Landmarks च्या यादीमध्ये पाचव्या स्थानावर आहे.
ताजमहालच्या शिरपेचात मनाचा तुरा जगातील भव्य दिव्य दहा वास्तूंच्या यादीमध्ये भारतातला ताजमहाल पाचव्या क्रमांकावर.
- अमृता कदम
परदेशी लोकांसाठी भारतातलं मुख्य आकर्षण असतं ते ताजमहाल. भारतात येणाऱ्या सर्वाधिक विदेशी पर्यटकांची पसंती ही ताजमहाललाच असते.
शुभ्र संगमरवरातली ही वास्तू म्हणजे मुघलकालीन वास्तूरचनेचा एक अप्रतिम नमुना आहे. त्यामुळेच जगातील आश्चर्यांमध्येही ताजमहालचा समावेश होतो.
ताजमहालच्या या कीर्तीत अजून एका मानाची नोंद झाली आहे. जगातील भव्य-दिव्य अशा दहा वास्तूंच्या यादीमध्ये ताजमहालनं स्थान पटकावलं आहे. प्रेमाचं प्रतीक म्हणून ओळखली जाणारी ही वास्तू Travellers’ Choice awards for Landmarks च्या यादीमध्ये पाचव्या स्थानावर आहे. सर्वांत महत्त्वाचं म्हणजे या यादीत जागा मिळवणारी ही भारतातील एकमेव वास्तू आहे.
आशियातील भव्य वास्तूंचा विचार केला तर ताजमहालचा क्र मांक दुसरा लागतो. पहिलं स्थान कंबोडियामधल्या अंग्कोर वॅटनेच परत पटकावलं आहे. खरंतर भारतात अशा अनेक वास्तू आहे ज्यांची रचना आणि सौंदर्य हे पाहणाऱ्याला आवाक करतं. पण तरीही यादीत भारतातला ताजमहालच का? असा प्रश्न कोणालाही पडू शकतो. याचं उत्तर जितकं ताजमहालचं सौंदर्य आहे तितकं ते सौंदर्य जतन करण्यासाठी पुरातत्त्व विभागाकडून पुरवलं जाणारं लक्षही आहे. आज ताजमहालच्या तोडीचं सौंदर्य भारतात आहे गरज आहे ती ते सौंदर्य टिकवण्याची, जतन आणि संवर्धन करण्याची. आणि तितकीच गरज आहे ताजमहालची किर्ती जशी जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचली तशी भारतातल्या इतर प्रसिध्द वास्तूंची प्रसिध्दीही जगभरात पोहोचवण्याची!. हे जमलं तर जगातील भव्य दिव्य वास्तूंच्या यादीत भारतातून ताजमहाल हा एकटाच नसेल !