Ram Lalla Surya Tilak Video: अयोध्येत रामललाला 'सूर्यतिलक'... प्रभू श्रीरामाच्या भक्तांनी अनुभवला अद्भूत क्षण

By ऑनलाइन लोकमत | Published: April 17, 2024 12:30 PM2024-04-17T12:30:46+5:302024-04-17T12:53:12+5:30

Ram Lalla Surya Tilak Video on Ram Navami, Opto-Mechanical Technique: 'सूर्यतिलक' मागे आहे खास तंत्रज्ञान... समजून घ्या 'ऑप्टोमेकॅनिकल' पद्धतीबाबत सविस्तर

Ayodhya Ram Mandir Ram Lalla Surya Tilak ceremony Opto-Mechanical Technique on ram navami watch video | Ram Lalla Surya Tilak Video: अयोध्येत रामललाला 'सूर्यतिलक'... प्रभू श्रीरामाच्या भक्तांनी अनुभवला अद्भूत क्षण

Ram Lalla Surya Tilak Video: अयोध्येत रामललाला 'सूर्यतिलक'... प्रभू श्रीरामाच्या भक्तांनी अनुभवला अद्भूत क्षण

Ram Lalla Surya Tilak Video on Ram Navami, Opto-Mechanical Technique: देशभरात आज रामनवमीचा सण मोठ्या थाटामाटात साजरा केला जात आहे. अयोध्येत राम मंदिराच्या उभारणीनंतर रामललाची ही पहिलीच रामनवमी आहे. त्यामुळे यावेळी रामललाची विशेष पूजा करण्यात आली. रामललाचा दिव्य राज्याभिषेक झाला तर झालाच पण आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला ते रामललाचा 'सूर्यतिलक'! दुपारी १२ वाजता रामललाचे सूर्य तिलक करण्यात आले. खास तंत्रज्ञानाच्या मदतीने सूर्यकिरणे रामललाच्या कपाळाच्या मधोमध पडल्याचे दिसून आले. 'सूर्यतिलक'चा हा अनोखा आणि अद्भूत अनुभव देशभरातील सर्व रामभक्तांना 'याची देही, याची डोळा' पाहता आले.

अयोध्येतील श्रीराम मंदिराची रचना एका विशिष्ट पद्धतीने करण्यात आली आहे. त्यात एक अशी यंत्रणा बसविण्यात आली आहे, ज्यामुळे श्रीरामललाच्या मूर्तीच्या कपाळावर श्रीरामनवमीला सूर्यकिरणांचा स्पर्श होईल. जाणून घेऊ या यंत्रणेबाबत...

  1. सूर्यकिरणे एका जागेतून प्रवेश करतील. ती या उपकरणाच्या लेन्सवर पडतील.
  2. तेथून ती परावर्तित करण्यात येतील. त्यासाठी विशिष्ट प्रकारचा आरसा एका ठराविक कोनात बसविण्यात आला आहे.
  3. तिसऱ्या मजल्यावर शिखराजवळ 'ऑप्टोमेकॅनिकल' यंत्रणा बसविण्यात आली आहे. या यंत्रणेला 'सूर्य तिलक' नाव दिले आहे.
  4. सूर्यप्रकाश श्रीरामललांच्या ललाटी आणण्यासाठी प्रकाशाचा मार्ग परावर्तित करण्यात येईल. परावर्तित किरणे गाभाऱ्यापर्यंत पोहोचतील.
  5. गाभाऱ्याच्या बाहेर असलेल्या ठराविक कोनातील आरशामुळे तेथून सूर्यकिरणे परावर्तित होऊन श्रीरामललाच्या कपाळाला स्पर्श करतील.

Web Title: Ayodhya Ram Mandir Ram Lalla Surya Tilak ceremony Opto-Mechanical Technique on ram navami watch video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.