धक्कादायक! आई, पत्नीची केली हत्या, तीन मुलांना छतावरून फेकून केलं ठार, अखेरीस स्वत:ही संपवलं जीवन
By ऑनलाइन लोकमत | Published: May 11, 2024 10:26 AM2024-05-11T10:26:53+5:302024-05-11T10:27:39+5:30
Uttar Pradesh Crime News:
एका माथेफिरू तरुणाने आई, पत्नी आणि तीन मुलांची हत्या केल्यानंतर स्वत:ही जीवन संपवल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. उत्तर प्रदेशमधील सीतापूर येथील पल्हापूर ही घटना घडली आहे. एका माथेफिरू तरुणाने त्याच्या आईची गोळ्या झाडून हत्या केली. त्यानंतर पत्नीला हातोड्याने प्रहार करून ठार मारले. तो एवढ्यावरच थांबला नाही. त्याने त्याच्या तीन मुलांचाही छतावरून खाली फेकून जीव घेतला. आई, पत्नी आणि मुलांसह पाच जणांचा जीव घेतल्यानंतर आरोपीने स्वत:वर गोळ्या झाडून हत्या केली. मिळत असलेल्या प्राथमिक माहितीनुसार आरोपी हा व्यसनी आणि मानसिकदृष्ट्या त्रस्त असल्याचे समोर येत आहे.
याबाबत मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार आरोपी हा पाल्हापूर येथील शेकतरी वीरेंद्र सिंह यांचा मुलगा अनुराग सिंह आहे. त्याने काल रात्री हे भीषण हत्याकांड घडवून आणले. मानसिकदृष्ट्या विक्षिप्त असलेल्या अनुराग सिंह याने आई सावित्री देवी (६२), पत्नी प्रियंका सिंह (४०), मुलगी आश्वी (१२), मुलगा अनुराग आणि मुलगी आराना (८) यांचा जागीच मृत्यू झाला. तर आद्विक (४) याने स्वत:वर गोळ्या झाडून जीवन संपवले. सकाळी ही घटना घडल्यानंतर संपूर्ण गावात खळबळ उडाली आहे.
दरम्यान, या भीषण हत्याकांडाबाबत सीतापूरचे एसएसपी चक्रेश मिश्रा यांनी सांगितले की, आज मथुरा येथील रामपूर पोलिसांनी मानसिकदृष्ट्या आजारी असलेल्या अनुराग सिंह (४५) या व्यक्तीने स्वत:वर गोळ्या झाडून जीवन संपवण्यापूर्वी आपल्याच कुटुंबातील ५ जणांची गोळ्या झाडून हत्या केल्याची माहिती दिली. पोलीस आणि एफएलसीचं पथक या घटनेचा अधिक तपास करत आहेत.