लालूंचा मुलगा नाही, जावई! काकाने पुतण्याला संधी दिली, अखिलेश यादवांच्या जागी तेजप्रताप यादव लढणार
By ऑनलाइन लोकमत | Published: April 22, 2024 05:20 PM2024-04-22T17:20:36+5:302024-04-22T17:22:34+5:30
तेज प्रताप यादव या नावामुळे अनेकांचा गैरसमज होण्याची शक्यता आहे. हे लालूपूत्र नसून लालू प्रसादांचे जावई आहेत. तसेच अखिलेश यांचे चुलत भाऊ रणवीस सिंह यादव यांचे पूत्र आहेत.
लोकसभा निवडणुकीसाठी समाजवादी पक्षाने आणखी एक यादी जाहीर केली आहे. यामध्ये अखिलेश यादवांचीकन्नौज ही जागा आणि बलिया या दोन मतदारसंघांमध्ये उमेदवारी दिली आहे. आश्चर्यकारक म्हणजे अखिलेश यांनी आपली दावेदारी मागे घेऊन कन्नौजमधून लालू प्रसाद यांच्या जावयाला तिकीट दिले आहे. या जावयाचे नाव तेज प्रताप यादव आहे.
तर बलियामधून सनातन पांडे यांना उमेदवारी दिली आहे. कन्नौजमधून अखिलेश यादव लढण्याची शक्यता होती. यामुळे शेवटपर्यंत ही सीट जाहीर करण्यात आली नव्हती. अखिलेश यादव ही लोकसभा लढविणार नाहीत हे आता स्पष्ट झाले आहे. याऐवजी त्यांनी त्यांच्या पुतण्याला मैदानात उतरविले आहे.
तेज प्रताप यादव या नावामुळे अनेकांचा गैरसमज होण्याची शक्यता आहे. हे लालूपूत्र नसून लालू प्रसादांचे जावई आहेत. तसेच अखिलेश यांचे चुलत भाऊ रणवीस सिंह यादव यांचे पूत्र आहेत. रणवीर यांचा ३६ व्या वर्षी मृत्यू झाला होता. तेजप्रताप यांची पत्नी राजलक्ष्मी या लालू प्रसाद यादवांच्या कन्या आहेत.
तेज प्रताप यादव हे मैनपूरीहून खासदार झाले होते. मुलायम सिंहांनी २०१४ मध्ये मैनपूरी आणि आझमगढ येथून निवडणूक लढविली होती. दोन्ही जागा जिंकल्याने त्यांनी मैनपूरीहून राजीनामा दिला होता. पोटनिवडणुकीत तेजप्रताप जिंकले होते. २०१९ मध्ये मुलायम सिंहांनी मैनपुरीतून निवडणूक लढविली होती. त्यांच्या निधनानंतर अखिलेश यांच्या पत्नी डिंपल यादव यांनी निवडणूक लढविली. यामुळे आता तेजप्रताप यांना संधी देण्यात आली आहे. या जागेवर भाजपाचे खासदार सुब्रत पाठक उभे आहेत.