३१४ प्राथमिक शिक्षकांना वरिष्ठ वेतनश्रेणी मंजूर
By admin | Published: May 30, 2014 12:19 AM2014-05-30T00:19:27+5:302014-05-30T00:19:27+5:30
जिल्हा परिषदेतील ३१४ प्राथमिक शिक्षकांना वरिष्ठ वेतनश्रेणी (चटोपाध्याय) मंजुरीचे आदेश मुख्य कार्यकारी अधिकारी उदय चौधरी यांनी सोमवारी निर्गमित केले. चटोपाध्याय आयोग शिफारशीनुसार एकाच वेतनश्रेणीत
वर्धा : जिल्हा परिषदेतील ३१४ प्राथमिक शिक्षकांना वरिष्ठ वेतनश्रेणी (चटोपाध्याय) मंजुरीचे आदेश मुख्य कार्यकारी अधिकारी उदय चौधरी यांनी सोमवारी निर्गमित केले. चटोपाध्याय आयोग शिफारशीनुसार एकाच वेतनश्रेणीत सलग १२ वर्षांच्या सेवेनंतर त्यातील अटींची पुर्तता केलेल्या पात्र शिक्षकांना मिळणारा वरिष्ठ वेतनश्रेणीचा हा लाभ या आदेशान्वये दिला जाणार आहे.
मुख्य कार्यकारी अधिकार्यांनी मंजुरी दिलेल्या आदेशामध्ये ३0२ सहायक शिक्षक, ८ पदविधर शिक्षक, ३ उच्चश्रेणी मुख्याध्यापक व एक केंद्र प्रमुख अशा जिल्ह्यातील आठही पंचायत समितीमधील एकूण ३१४ जणांचा समावेश आहे. यात सन २000 मध्ये रूजू झालेल्या शिक्षण सेवकांच्या पहिल्या बॅचमधील १९७ शिक्षकांचासुद्धा समावेश करण्यात आला आहे. १२ ऑक्टोबर २00९ च्या शासन निर्णयाप्रमाणे त्यांचा शिक्षण सेवकाचा तीन वर्षांंचा कालावधी सलग सेवेमध्ये ग्राह्य धरून ते २0१२ मध्ये पात्र ठरले होते. त्यांना ही वेतनश्रेणी लागू करण्यासाठी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाने प्रयत्न केले होते.
यानंतर वर्धा जिल्हा प्राथमिक शिक्षक संघाकडून जिल्हा परिषदेमध्ये त्याचा पाठपुरावा करण्यात आला. शिवाय अन्य शिक्षक संघटनांनीही यासाठी प्रयत्न केल्याने सर्व १९७ शिक्षण सेवकांना या वेतनश्रेणीचा लाभ देण्यात आला. या प्रस्तावाची कारवाई तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी शेखर चóो यांच्या कक्षात ३१ ऑगस्ट २0१३ ला झालेल्या शिक्षक संघाच्या पदाधिकार्यांच्या बैठकीमध्येच मान्य करून सुरू झाली होती. तेव्हा सर्व पंचायत समितीच्या गटशिक्षणाधिकार्यांना त्या शिक्षण सेवकांचे प्रस्ताव तात्काळ सादर करण्याचे लेखी निर्देश देण्यात आले होते.
३१४ प्राथमिक शिक्षकांना वरिष्ठ वेतनश्रेणी मंजूर करण्याच्या वर्धा जि.प. प्रशासनाच्या या निर्णयामुळे शिक्षकांद्वारे समाधान व्यक्त केले जात आहे.(कार्यालय प्रतिनिधी)