अवेळी वीज पुरवठा खंडित करणाºयांवर होणार कार्यवाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 3, 2017 11:34 PM2017-11-03T23:34:17+5:302017-11-03T23:34:27+5:30

सध्या शेतीचा हंगाम आहे. अपुरा पाऊस झाल्यामुळे पिकांना पाणी देणे आवश्यक आहे. अशा परिस्थितीत शेतकºयांना पुर्वसूचना न देता कृषीपंपाचा वीज पुरवठा खंडित करू नये.

Action will be taken on uninterrupted power supply | अवेळी वीज पुरवठा खंडित करणाºयांवर होणार कार्यवाही

अवेळी वीज पुरवठा खंडित करणाºयांवर होणार कार्यवाही

Next
ठळक मुद्देसमस्यांचा आढावा : विधानसभा क्षेत्रातील बैठकीत आमदारांच्या सूचना

लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : सध्या शेतीचा हंगाम आहे. अपुरा पाऊस झाल्यामुळे पिकांना पाणी देणे आवश्यक आहे. अशा परिस्थितीत शेतकºयांना पुर्वसूचना न देता कृषीपंपाचा वीज पुरवठा खंडित करू नये. अन्यथा पुरवठा खंडित करणाºया अधिकाºयांवर कार्यवाही करणार येईल, अशी स्पष्ट ताकीद आ. डॉ. पंकज भोयर यांनी विश्रामगृह येथे आयोजित महावितरणच्या बैठकीत संबंधीत अधिकाºयांना दिली.
वर्धा विधानसभा क्षेत्रातील ग्रामीण भागातील वीज विभागाशी संबंधित समस्यांसाठी आ.डॉ. पंकज भोयर यांनी बैठकीचे आयोजन केले होते. बैठकीला जि.प. कृषी सभापती मुकेश भिसे, भाजपाचे महामंत्री सुनिल गफाट, सेलू तालुका भाजपा अध्यक्ष अशोक कलोडे, महावितरणचे कार्यकारी अभियंता उत्तम उरकुडे, उपकार्यकारी अभियंता एस.एम. पडोळे, चंदन गावंडे, एन.डी. उज्जैनकर, अतिरीक्त कार्यकारी अभियंता एस.एम. पारधी, माजी जि.प. सभापती मिलिंद भेंडे, पं.स. चे गटनेते महेश आगे, किसान मोर्चाचे विलास वरटकर, संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष हरीष पारिसे, नंदु झोटींग, शेतकरी खोडे, नरेंद्र डाफे, पंकज दुधबडे, अनिल कराळे आदी उपस्थित होते.
आमदार भोयर यांनी कृषी संजीवणी योजना प्रभावीपणे शेतकºयांपर्यंत पोहचवावी अशा सूचना केल्या. तसेच परिसरातून आलेल्या तक्रारींचा निपटारा करण्यात आला. सोंडी येथील राऊत यांच्या शेतातील कृषी पंपाची डीपी सुरू करण्यात यावी. खापरी येथील डीपीची तपासणी करून विद्युत पुरवठा सुरळीत करण्यात यावा. खापरी व झडशी येथे अतिरिक्त डीपीची व्यवस्था करण्यात यावी. खापरी येथील जनमित्र बागडे यांची चौकशी करण्यात येऊन येथील विद्युत पुरवठा सुरळीत करण्यात यावी.
सेलू तालुकातील धानोली (गावंडे) येथील बंद असलेली नवीन डीपी त्वरीत सुरू करण्यात यावी. खापरी येथील सूर्यभान बुधबावरे व दिलीप ठाकुर यांचे फॉल्टीमिटर त्वरीत बदलविण्यात यावे. रेहकी येथे नविन डीपी देण्याची तजवीज करावी. सेलू तालुक्यात अनेक ठिकाणी रोहित्रातील तांत्रिक बिघाडामुळे नेहमी वीज पुरवठा प्रभावित होते. या संदर्भात कार्यवाही करावी असे निर्देश आ. डॉ. पंकज भोयर यांनी बैठकीत दिले.
बैठकीला उपस्थित सदस्यांनी काही तक्रारी यावेळी मांडल्या. शेतकरी बांधवांना सर्व शासकीय योजनांचा लाभ देण्याच्या सूचना केल्या.
कृषी संजीवनी योजनेची प्रभावी अंमलबजावणी करा
बैठकीत शेतकºयांच्या संबंधीत समस्यांचा आढावा आमदारांनी घेतला. कापूस पिकाला सध्या सिंचन सुरू आहे. सोबतच रबी हंगामाचीही तयारी सुरू आहे. शेतकºयांकडे महावितरणची थकबाकी असली तरी अद्याप शेतमाल घरी आला नसल्याने थकीत देयक शेतकरी भरू शकत नाही. अशातच मुख्यमंत्री कृषी संजीवणी योजना अंमलात आणली आहे. त्यामुळे पूर्वसूचना न देता शेतकºयांचा विजपुरवठा खंडित करू नये. तसेच कृषी संजीवणी योजनेचा शेतकºयांना लाभ देण्याचे निर्देश दिले.

Web Title: Action will be taken on uninterrupted power supply

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.