वन्यप्राण्यांचा बंदोबस्त करा

By admin | Published: June 3, 2015 02:19 AM2015-06-03T02:19:48+5:302015-06-03T02:19:48+5:30

हा भाग जंगलव्याप्त असून या भागातील शेतकऱ्यांना दरवर्षी जंगली श्वापदांमुळे होणाऱ्या नुकसानीचा सामना करावा लागतो.

Arrange wild animals | वन्यप्राण्यांचा बंदोबस्त करा

वन्यप्राण्यांचा बंदोबस्त करा

Next

वनविभागाकडे तक्रार : दरवर्षी सोसावी लागते पिकांची नासाडी
वर्धा : धामणगाव(वा.) हा भाग जंगलव्याप्त असून या भागातील शेतकऱ्यांना दरवर्षी जंगली श्वापदांमुळे होणाऱ्या नुकसानीचा सामना करावा लागतो. परिसरातील रहिवाश्यांचे उदरनिर्वाहाचे एकमात्र साधन शेती असून त्यातही नुकसान सोसावे लागत असल्याने यआ वन्यप्राण्यांचा बंदोबस्त करुन शेतकऱ्यांना दिलासा देण्याची मागणी वनविभाग व जिल्हाधिकारी यांच्याकडे करण्यात आली आहे.
या भागातील शेतकऱ्यांना श्वापदांचा धोका असतो. शिवाय जंगलाचा परिसर शेतीला लागुन असल्याने रानडुक्कर, रोही, माकडे यांचा शेतात सतत वावर असतो. हे प्राणी शेतात शिरुन पिकांची नासाडी करतात. तर कधी रात्रीतून पीक फस्त करीत असल्याने शेतकऱ्यांना नाहक नुकसान सोसावे लागते. जंगली श्वापदांमुळे झालेल्या नुकसानीची भरपाई मिळत नसल्याने याचा भुर्दंड शेतकरी सहन करीत आहे. वनविभागाकडे याची तक्रार केली असता आजवर कोणतीच भरपाई देण्यात आलेली नाही. अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष स्थळी भेट देत नुकसान भरपाई देण्याचे आश्वासन दिले. आजवर कोणतीच आर्थिक मदत मिळाली नसल्याने शेतकऱ्यांची प्रतीक्षा कायम आहे.(स्थानिक प्रतिनिधी)

Web Title: Arrange wild animals

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.