१२५ शेतकºयांच्या बीटी कपाशीवर बोंडअळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 14, 2017 10:40 PM2017-11-14T22:40:12+5:302017-11-14T22:40:27+5:30

कपाशीच्या बीटी वाणावर १२० दिवसापर्यंत बोंडअळीचा प्रभाव होत नसल्याचे कंपन्यांकडून सांगण्यात येते. असे असतानाही यंदाच्या खरीपात शेंदरी बोंड अळीचा प्रादूर्भाव दिसून आला.

Bollwether on the BT cotton of 125 farmers | १२५ शेतकºयांच्या बीटी कपाशीवर बोंडअळी

१२५ शेतकºयांच्या बीटी कपाशीवर बोंडअळी

googlenewsNext
ठळक मुद्देशेतकरी हवालदिल : अंकुरच्या ३०२८ या वाणावार सर्वाधिक प्रादूर्भाव

सुरेंद्र डाफ ।
लोकमत न्यूज नेटवर्क
आर्वी : कपाशीच्या बीटी वाणावर १२० दिवसापर्यंत बोंडअळीचा प्रभाव होत नसल्याचे कंपन्यांकडून सांगण्यात येते. असे असतानाही यंदाच्या खरीपात शेंदरी बोंड अळीचा प्रादूर्भाव दिसून आला. यामुळे आर्वी तालुक्यातील २४ कृषी मुख्यालयांतर्गत १३७ गावातील १२८ कपाशी पिकाच्या प्लॉटचे तालुका कृषी कार्यालयाने सर्वेक्षण केले. त्यातील १२५ शेतकºयांच्या कृषी प्लॉटवर बोंडअळीचा प्रादूर्भाव आढळून आला. यातील बहुतांश प्लॉट अंकूर कंपनीच्या ३०२८ या वाणाचे असल्याचे अहवालात नमूद आहे.
आर्वी तालुक्यात एकूण २४ कृषी मुख्यालये असून यात खरांगणा, पिंपळखुटा, सोरटा, विरूळ, पानवाडी, दहेगाव (गोंडी), मदना, रसुलाबाद, पाचोड, रोहणा, वाढोणा, पांजरा (बोथली), आर्वी नांदोरा, बेढोणा, देऊरवाडा, जळगाव, वर्धमनेरी, नांदपूर, शिरपू, धनोडी (बहा.), नेरी, वाठोडा, दहेगाव (मु.) या २४ गावांचा समावेश येतो. या मुख्यालयांतर्गत येणाºया गवातील शेतकºयांच्या १२८ प्लॉटवर बोंडअळीचे सर्वेक्षण झाले. यात आढळलेल्या बोंडअळीमुळे बियाणे कंपन्यांकडून शेतकºयांची फासवणूक होत असल्याचे समोर आले आहे. यापूर्वी २०१६ मध्ये असाच प्रकार घडला होता. यावेळी बियाणे कंपन्यांवर कारवाई करण्यात आली आहे.
यंदाच्या हंगामातही हाच प्रकार झाल्याचे समोर आले आहे. यंदाच्या हांगामात या कंपन्यांवर काय कार्यवाही होते हा मुद्दा सध्या ऐरणीवर आला आहे. या कीड सर्वेक्षणासाठी कपाशी पिकाच्या दहा वाणांची निवड करून बोंड अळींच्या किडींचे सर्वेक्षण करण्यात आले होते.

खरीपातील संकटाने शेतकरी हैराण
यंदाच्या खरीप हंगामात कपाशीवर आलेल्या या संकटात जिल्ह्यातील शेतकरी हवालदिल झाला आहे. या संकटात सापडलेल्या शेतकºयांना शासनाच्यावतीने मदत मिळण्याची गरज व्यक्त करण्यात आली आहे. या शेतकºयांना मदत देण्याचे शासनाचे प्रयत्न असल्याचे सांगण्यात आले आहे.

गत दोन हंगामापासून कपाशी बीटी बियाण्यांवर मोठ्या प्रमाणावर बोंडअळीचा प्रादुर्भाव आढळून येत आहे. यात आर्वी तालुक्यातील २४ कृषी मुख्यालयांतर्गत कपाशी पिकाच्या बोंडअळींचे सर्व्हेक्षण करण्यात आले आहे. यातून बियाणे कंपन्यांचा रोग प्रतिकारक्षम बियाणे असल्याचा दावा फोल ठरला आहे.
- प्रशांत गुल्हाने, तालुका कृषी अधिकारी, आर्वी

Web Title: Bollwether on the BT cotton of 125 farmers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.