पर्यटकांसाठी बदलला जातोय बोर अभयारण्याचा ‘लूक’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 8, 2018 12:01 AM2018-03-08T00:01:08+5:302018-03-08T00:01:08+5:30

जिल्ह्यातील एकमेव सेलू तालुक्यांतर्गत येणारे बोर अभयारण्य हे पर्यटकांसाठी आकर्षणाचे केंद्र आहे. जंगल भ्रमंतीसाठी बोर व्याघ्र प्रकल्प ही पर्वणी असली तरी पाहिजे तशी मनोरंजनाची साधने उपलब्ध नाहीत.

Bore Wildlife Sanctuary 'Look' | पर्यटकांसाठी बदलला जातोय बोर अभयारण्याचा ‘लूक’

पर्यटकांसाठी बदलला जातोय बोर अभयारण्याचा ‘लूक’

Next

ऑनलाईन लोकमत
बोरधरण : जिल्ह्यातील एकमेव सेलू तालुक्यांतर्गत येणारे बोर अभयारण्य हे पर्यटकांसाठी आकर्षणाचे केंद्र आहे. जंगल भ्रमंतीसाठी बोर व्याघ्र प्रकल्प ही पर्वणी असली तरी पाहिजे तशी मनोरंजनाची साधने उपलब्ध नाहीत. यामुळे पर्यटकांचा भ्रमनिरास होतो. ही बाब लक्षात घेत हिंगणी वनपरिक्षेत्र अधिकारी प्रमोद वाढे यांनी नवीनतम उपक्रम राबवित मनोरंजनाची साधने उपलब्ध केलीत. यामुळे पर्यटकांसाठी बोर अभयारण्याचा ‘लूक’ बदलत असल्याचेच दिसून येत आहे. या बदलत्या लुकची नागपूर विभागाचे आयुक्त अनुपकुमार यांनी बुधवारी भेट देत पाहणीही केली.
पर्यटकांच्या मनोरंजनासाठी नवीन उपक्रम राबविण्याकडे वनपरिक्षेत्र अधिकारी वाढे यांनी लक्ष केंदीत केले आहे. अनेक दिवसांच्या प्रयत्नांनंतर त्यांना यशही प्राप्त झाले. लवकरच पर्यटकांसाठी कमी शुल्कात कमांडो ब्रीज, बरमा ब्रीज पूल, नेट रोप व यासारख्या अनेक धाडसी खेळांचा आनंद लूटता येईल, असे वाढे यांनी सांगितले. याबाबतच्या प्रस्तावास मान्यता प्राप्त झाली असून जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी निधी उपलब्ध करून दिल्याचेही त्यांनी सांगितले.
बुधवारी नागपूर विभागाचे आयुक्त अनुपकुमार यांनी बोर अभयारण्याला भेट देऊन पाहणी केली. याप्रसंगी जिल्हाधिकारी शैलेश नवाल, जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी अजय गुल्हाणे, हिंगणी वनपरिक्षेत्र अधिकारी प्रमोद वाढे, सेलूचे तहसीलदार महेंद्र सोनोने आदी उपस्थित होते. प्रशिक्षित युवकांची भेट घेत अनुपकुमार यांनी, पर्यटकांना सौजन्याची वागणूक देत अधिकाधिक लोकांना येथे येण्यासाठी आकर्षित करावे. तालुक्यात उत्पादित फळांचे व महिला बचतगटांद्वारे उत्पादित वस्तुंचे येथे स्टॉल लावण्यावर भर द्यावा. येथे विक्रीसाठी ठेवण्यात येणाºया प्रॉडक्टसाठी ‘बोर प्रॉडक्ट’, या नावाने लघु उद्योग सुरू केल्यास बेरोजगारांना रोजगार उपलब्ध होऊ शकतो. यासाठी प्रयत्न करावे, असे सांगितले. सोबतच पर्यटकांसाठी लवकरच नौकाविहाराची सोय या ठिकाणी करण्यासाठी पाहिजे ते सहकार्य करण्याची ग्वाहीदेखील अनुपकुमार यांनी दिली.
वनपर्यटन इको टुरिझम अंतर्गत होतोय विकास
जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत वनपर्यटन इको टूरिझम या शिर्षाखाली हिंगणी वनपरिक्षेत्रातील संयुक्त वनव्यवस्थापन समिती बोरी (को) द्वारे साहसिक उपक्रमाच्या माध्यमातून यासाठी परिसरातील अनेक युवकांना प्रशिक्षीत करण्यात आले. या युवकांच्या देखरेखीखाली कुणाला ईजा होणार नाही; पण आबालवृद्धांना याचा आनंद लूटता यावा म्हणून सुरक्षिततेचे प्रबंध करण्यात आले आहे.

Web Title: Bore Wildlife Sanctuary 'Look'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.