कॉपीराईट अॅक्ट अन्वये दोघांवर गुन्हा
By admin | Published: March 24, 2017 01:48 AM2017-03-24T01:48:40+5:302017-03-24T01:48:40+5:30
थ्री-एम कंपनीच्या नावावर नकली रिफ्लेटर विकत असल्याप्रकरणी मोटार हाऊस डिलर्स स्पेअर पार्ट, ठाकरे मार्केट समोर
वर्धा : थ्री-एम कंपनीच्या नावावर नकली रिफ्लेटर विकत असल्याप्रकरणी मोटार हाऊस डिलर्स स्पेअर पार्ट, ठाकरे मार्केट समोर वर्धा या दुकानाचे संचालक प्रमोद भगवतीप्रसाद मुरारका व नकुल प्रमोद मुरारका यांच्याविरूद्ध कॉपीराईट अॅक्ट अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला. ही कारवाई गुरूवारी करण्यात आली.
थ्री-एम कंपनीच्या नावावर नकली रिफ्लेक्टर विकले जात असल्याची माहिती कंपनीच्या प्रतिनिधींना मिळाली. यावरून इआयपीआर (इन्फोर्सर्स आॅफ इंटॅलेक्च्यूअल प्रॉपर्टी राईट्स) यांच्याकडे तक्रार करण्यात आली. यावरून गुरूवारी इआयपीआर पथकाचे गणेश संभाजी राणे रा. मुंबई यांनी गुरूवारी पोलिसांसह दाखल होत तपासणी केली. यात मुरारका यांच्या मोटर हाऊस डिलर्स स्पेअर पार्ट या दुकानात ९ बंडल नकली रिफ्लेक्टर आढळून आले. यातील प्रत्येक बंडलची किंमत ४ हजार ५०० रुपये असून पथक व पोलिसांनी ४० हजार ५०० रुपयांचे नऊ बंडल जप्त केले. नकली रिफ्लेक्टर विकून कॉपीराईटच्या स्वामित्वाचे, मूळ हक्काचे उल्लंघन केल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली. याबाबत पथकातील गणेश राणे यांनी दिलेल्या तक्रारीवरून शहर पोलिसांनी कॉपीराईट अॅक्ट १९५७ च्या कलम ५१, ६३ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. प्रकरणाचा तपास ठाणेदार राजेंद्र शिरतोडे यांच्या मार्गदर्शनात परिविक्षाधिन पोलीस उपनिरीक्षक पपीन रामटेके करीत आहे.(कार्यालय प्रतिनिधी)