१२०० स्काऊट गाईड्सने सादर केली साहसी प्रात्यक्षिके

By admin | Published: February 1, 2017 01:17 AM2017-02-01T01:17:17+5:302017-02-01T01:17:17+5:30

पवनार येथे ३३ वा स्काऊट गाईड मेळावा आयोजित करण्यात आला आहे. स्वामी विवेकानंद इंटरनॅशनल

Daredevil demonstrations performed by 1200 Scout Guides | १२०० स्काऊट गाईड्सने सादर केली साहसी प्रात्यक्षिके

१२०० स्काऊट गाईड्सने सादर केली साहसी प्रात्यक्षिके

Next

पवनार येथे ३३ वा जिल्हास्तरीय मेळावा : स्काऊट व गाईड्सकरिता विशेष साहस प्रकल्प तयार
वर्धा : पवनार येथे ३३ वा स्काऊट गाईड मेळावा आयोजित करण्यात आला आहे. स्वामी विवेकानंद इंटरनॅशनल विद्यालयाच्या प्रांगणात आयोजित या मेळाव्यात जिल्ह्यातील १ हजार २०० स्काऊट-गाईड्सने साहसी प्रात्याक्षिक सादर केले. याकरिता मेळाव्यात खास ‘साहस प्रकल्प’ तयार करण्यात आला होता.
स्थानिक एसएसएनजे महाविद्यालयातील नेताजी सुभाषचंद्र बोस रोव्हर व राणी लक्ष्मीबाई रेंजर टिमच्यावतीने ३० जानेवारी ते १ फेब्रुवारी दरम्यान तीन दिवसीय साहस खेळ प्रकल्पाचे आयोजन करण्यात आले आहे. या प्रकल्पाला स्कॉऊटचे जिल्हा मुख्यालय आयुक्त व रोव्हर लिडर प्रा. मोहन गुजरकर, रोव्हर लिडर संतोष तुरक व रोव्हर लिडर प्रा. रविंद्र गुजरकर यांचे मार्गदर्शन लाभले. सदर जिल्हा मेळाव्यात सहभागी १,२०० स्कॉऊट आणि गाईड्सनी अडथळा पार प्रशिक्षण उपक्रमाचा आनंद लुटला.
साहस प्रकल्पाच्या उद्घाटन प्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वर्धा जिल्हा स्कॉऊट आणि गाईड्सचे अध्यक्ष सतीश राऊत तर प्रमुख अतिथी म्हणून प्राचार्य डॉ. सुरेश उपाध्याय, स्कॉऊटचे जिल्हा आयुक्त उमाकांत नेरकर, सचिव राम बाचले, जिल्हा प्रशिक्षण आयुक्त किरण जंगले, शिला पंचारिया, उर्मिला चौधरी, रेंजर लिडर वैशाली गुजरकर व स्कॉऊट आणि गाईड्सचे पदाधिकारी उपस्थित होते.
मेळाव्यादरम्यान भारताचे स्कॉऊट आणि गाईड्सचे मुख्य राष्ट्रीय आयुक्त भा.ई. नगराळे, जि. प. च्या मुख्यकार्यकारी अधिकारी नयना गुंडे, राज्य आयुक्त वसंत काळे, राज्य मुख्यालय आयुक्त आर.आर. जयस्वाल, जिल्हा मुख्य आयुक्त डॉ. शिरीष गोडे, प्राचार्या अर्चना गोलछा, विविध शाळेचे मुख्याध्यापक व स्कॉऊटस् आणि गाईडस्चे पदाधिकारी यांनी सादर साहस प्रकल्पास भेट देवून रोव्हर्सच्या उपक्रमाचे कौतुक केले. संचालन सहाय्यक रेंजर लिडर आश्विनी घोडखांदे यांनी केले तर आभार सहाय्यक रोव्हर लिडर साकिब पठाण यानी मानले. यशस्वीतेकरिता श्याम पोटफोडे, खुशाल घोडमारे, निलेश नेहारे, भुषण मानकर, रितीक थुल, विवेक दौदळे, संकेत हिवंज, धिरज कारामोरे, आशिष परचाके, स्वप्निल शिंगाडे, प्रवीण येनुरकर, वैभव रेंघे, धिरज कामडी, दिनेश सांळुखे, लोभास उघडे, मंगेश रौंदळे, रोव्हर्स व रेंजर्सनी सहकार्य केले.(प्रतिनिधी)

Web Title: Daredevil demonstrations performed by 1200 Scout Guides

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.