कर्जमाफी योजनेचा लाभ देण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2017 12:35 AM2017-09-27T00:35:35+5:302017-09-27T00:35:45+5:30
तालुक्यातील खरांगणा (गोडे) येथील वृद्ध शेतकºयाच्या मुलाने कर्जापायी आत्महत्या केली. यामुळे कुटुंबाची आबाळ होत आहे. या शेतकºयाला कर्जमाफी योजनेचा लाभ देण्यात यावा, अशी मागणी होत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : तालुक्यातील खरांगणा (गोडे) येथील वृद्ध शेतकºयाच्या मुलाने कर्जापायी आत्महत्या केली. यामुळे कुटुंबाची आबाळ होत आहे. या शेतकºयाला कर्जमाफी योजनेचा लाभ देण्यात यावा, अशी मागणी होत आहे. याबाबत जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांना निवेदनही देण्यात आले.
खरांगणा (गोडे) येथील ज्ञानेश्वर चौधरी (६८) यांच्याकडे १.७० हेक्टर आर शेतजमीन आहे. नापिकी होत असल्याने त्यांना वर्धा जिल्हा मध्यवर्ती बॅकेचे कर्ज फेडता आले नाही. शासनाने २००७-२००८ मध्ये कर्जमाफी केली; पण त्यावेळी चौधरी यांच्या कर्जाचे पुनर्गठण झाले. परिणामी, आजही कर्जाची रक्कम थकित आहे. त्यांचा मुलगा शरद ज्ञानेश्वर चौधरी याने कर्जाचे ओझे व नापिकीमुळे ३१ डिसेंबर २०१३ रोजी शेतात विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केली. त्यांच्या दोन मुलींचे लग्न झाले असून वृद्धत्वामुळे त्यांच्याकडून शेतीची तथा अन्य कामे होत नाही. शासनाने २००९ ते २०१६ चे कर्ज माफ केले; पण २००७ ते २००८ चे कर्जदार घेतले नाही. यामुळे ज्ञानेश्वर चौधरी यांच्या अगतिकतेचा विचार करीत कर्जमाफी द्यावी, अशी मागणी चौधरी यांनी केली आहे.