शॉर्टसर्किटमुळे किराणा दुकानाला आग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 4, 2018 11:27 PM2018-02-04T23:27:35+5:302018-02-04T23:28:27+5:30
पहाटे ३ वाजताच्या सुमारास शॉर्ट सर्किटमुळे किराणा दुकानाला आग लागली. यात दुकानातील साहित्याचा जळुन कोळसा झाला. ही घटना मोरांगणा येथे रविवारी सकाळी उघड झाली. यात १ लाख ७१ हजाराचे नुकसान झाले.
ऑनलाईन लोकमत
आकोली : पहाटे ३ वाजताच्या सुमारास शॉर्ट सर्किटमुळे किराणा दुकानाला आग लागली. यात दुकानातील साहित्याचा जळुन कोळसा झाला. ही घटना मोरांगणा येथे रविवारी सकाळी उघड झाली. यात १ लाख ७१ हजाराचे नुकसान झाले.
मोरांगणा गावात गणेश बबनराव जोहरी यांचे किराणा दुकान आहे. रात्री दुकान बंद करुन ते घरी गेले. पहाटे अकस्मात विजेत बिघाड झाल्याने दुकानाला आग लागली. पाहता पाहता आगीने भडका घेतला. शेजारी लोकांना आगीने रौद्ररुप धारण केले, जाग आली तोपर्यंत वेळ हातीची गेली होती. सुदैवाने आजुबाजूच्या घरांना कोणतीही हानी पोहचली नाही. याबाबत खरांगणा पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली असून जमादार गजानन बावणे व रामचंद्र गेडाम यांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. आगीत झालेल्या नुकसानाची भरपाई मिळण्याची मागणी होत आहे.