मूल्य निर्धारणासाठी फॉर्म्युला तयार व्हावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2017 12:32 AM2017-09-25T00:32:52+5:302017-09-25T00:33:05+5:30
देशात शेतमालाच्या मुल्य निर्धारणासाठी वेगवेगळी पद्धती असली तरी एका एकराच्या खर्चानुसार ती ठरविण्यात यावी. शिक्षा निती व सर्वोदय समाजाचा दृष्टीकोन काय असावा यावर चर्चा झाली पाहिजे.
लोकमत न्यूज नेटवर्क
सेवाग्राम : देशात शेतमालाच्या मुल्य निर्धारणासाठी वेगवेगळी पद्धती असली तरी एका एकराच्या खर्चानुसार ती ठरविण्यात यावी. शिक्षा निती व सर्वोदय समाजाचा दृष्टीकोन काय असावा यावर चर्चा झाली पाहिजे. शेतमालाचे मुल्य निर्धारित करण्याचा एक फार्म्युला तयार करण्यात यावा, असे प्रतिपादन सर्व सेवा संघाचे अध्यक्ष महादेव विद्रोही यांनी केले.
भारतीय कृषी आवाहन आणि समाधान या विषयावरील सेवाग्राम येथे आयोजित दोन दिवसीय राष्ट्रीय परिसंवादाच्या समारोपीय कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी लागलू करणे, ग्रामीण भागात पायाभूत सुविधा निर्माण करणे, राष्ट्रीय स्तरावर शेतकºयांचे संगठन व विचार पीठ सक्षमपणे निर्माण करणे या मुद्यावर एकमत झाले. यात्री निवासाच्या सभागृहामध्ये २३ व २४ सप्टेंबरला राष्ट्रीय स्तरावर परिसंवाद सर्व सेवा संघ, सेवाग्राम आश्रम प्रतिष्ठान व सद्भावना संघ यांच्यावतीने आयोजित करण्यात आला होता. समारोपीय कार्यक्रमाला अतिथी म्हणून आश्रम प्रतिष्ठानचे अध्यक्ष जयवंत मठकर उपस्थित होते. यावेळी त्यांनी विचार व्यक्त करताना स्वराजाचे आंदोलन उभे करायचे असेल तर शेतकºयांच्या सहभागाशिवाय शक्य नाही, असे गांधीजींचे मत होते. त्या दृष्टीने त्यांनी शेतकºयांच्या न्याय हक्कासाठी असहयोग आंदोलन देशात उभे केले. शरद जोशीच्या आंदोलनाला सर्व सेवा संघाने व सर्वोदयी परिवाराने बळ दिले. शेतकºयांच्या मालाला योग्य भाव मिळालेच पाहिजे. २ आॅक्टोबर हा दिवस गांधीजींची जयंती जागतिक अहिंसा दिन म्हणून पाळल्या जातो. पण, सरकारची भूमिका काही वेगळीच दिसत असल्याने सरकारशी पत्रव्यवहार होणे गरजेचे असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. संचालन अविनाश काकडे यांनी तर आभार शेख हुसैन यांनी मानले. प्रशांत गुजर यांनी यावेळी गीत सादर केले. कार्यक्रमाला डॉ. श्रीराम जाधव, डॉ. शिवचरण ठाकूर, सुदाम पवार, संजय कोल्हे, रामपाल जाट, महेंद्र धावडे, नितीन चौधरी, भीमराव भोयर, रामराव किटे, प्रमोद पाटील, विनायक ताकसांडे, शंकर बगाडे, राजेंद्र कुमज आदी उपस्थित होते.
विविध मुद्यांवर एकमत
आजच्या समारोपीय सत्रात स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी यावर अमिताभ पावडे, ग्रामीण व कृषी क्षेत्रात योग्य शिक्षणाच्या अभावामुळे आढळणारी समस्ये या विषयावर प्रा. नूतन माळवी, कृषी क्षेत्रात सकारात्मक बदल यावर प्रभूजी श्रीनिवासन यांनी विचार व्यक्त केले. सदर राष्ट्रीय परिसंवादात शेतकºयांच्या समस्यांच्या विविध मुद्यांवर एकमत झाले. सदर द्विदिवशीय परिसंवादाच्या यशस्वीतेसाठी बाबा खैरकार, सुरेंद्र नाईक, सचिन उगले, जीवन शेंडे, गजानन नेहारे आदींनी सहकार्य केले.