चार व्यावसायिकांना ठोठावला २० हजारांचा दंड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 1, 2017 11:11 PM2017-11-01T23:11:22+5:302017-11-01T23:11:34+5:30

कमी जाडीच्या प्लास्टिक पिशव्यांच्या वापरावर बंदी असताना त्याचा शहरात मोठ्या प्रमाणात वापर होत असल्याने वर्धा नगर पालिकेने विशेष मोहीम हाती घेऊन बुधवारी चार व्यावसायिकांना थेट २० हजारांचा दंड ठोठावला.

Four businessmen were fined 20 thousand rupees | चार व्यावसायिकांना ठोठावला २० हजारांचा दंड

चार व्यावसायिकांना ठोठावला २० हजारांचा दंड

Next
ठळक मुद्देपालिकेची विशेष मोहीम : प्लास्टिक पिशव्यांचा वापर करणे भोवले

लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : कमी जाडीच्या प्लास्टिक पिशव्यांच्या वापरावर बंदी असताना त्याचा शहरात मोठ्या प्रमाणात वापर होत असल्याने वर्धा नगर पालिकेने विशेष मोहीम हाती घेऊन बुधवारी चार व्यावसायिकांना थेट २० हजारांचा दंड ठोठावला. शिवाय सदर मोहिमेदरम्यान पालिका कर्मचाºयांनी सुमारे आठ किलो कमी जाडीच्या प्लास्टिक पिशव्या जप्त केल्या.
कमी जाडीच्या प्लास्टिक पिशव्या पर्यावरणाच्या दृष्टीने घातक असल्याने त्याच्या वापरावर बंदी घालण्यात आली आहे. त्याचा वापर होऊ नये याची जबाबदारी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या खांद्यावर देण्यात आली आहे. पूर्वी पालिका प्रशासनाच्यावतीने वेळोवेळी विशेष मोहीम राबवून कमी जाडीच्या प्लास्टिक पिशव्यांच्या वापर करू नये याबाबत व्यावसायिकांना समज देण्यात आली होती. परंतु, अनेक व्यावसायिकांकडून सदर प्लास्टिकच्या पिशव्यांचा वापर केल्या जात असल्याची माहिती मिळताच न.प.च्या मुख्याधिकारी अश्विनी वाघमळे यांच्या नेतृत्त्वात बुधवारी वर्धा शहरात विशेष मोहीम राबविण्यात आली. सदर मोहिमेदरम्यान पालिका कर्मचाºयांनी चार व्यावसायिकांकडून २० हजाराचा दंड वसूल केला. तसेच सुमारे ८ किलो कमी जाडीच्या प्लास्टिक पिशव्या जप्त केल्या. ही कारवाई न.प. मुख्याधिकारी अश्विनी वाघमळे, न.प. प्रशासकीय अधिकारी किशोर साखरकर यांच्या मार्गदर्शनात प्रवीण बोरकर, अशोक ठाकूर, विशाल सोमवंशी, स्रेहा मेश्राम, गुरूदेव हटवार, नवीन गुंडेवार आदींनी केली.

Web Title: Four businessmen were fined 20 thousand rupees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.