ग्रा.पं. स्तरावर गैरव्यवहार खपवून घेणार नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 10, 2017 12:50 AM2017-12-10T00:50:12+5:302017-12-10T00:52:06+5:30
ग्रामपंचायत स्तरावरील कोणतेही गैरव्यवहार खपवून घेतले जाणार नाही, अशी समज विभागाचे आ. रणजीत कांबळे यांनी पंचायत समितीच्या व जिल्ह्यातील संबंधित पाणीपुरवठा अधिकाऱ्यांना दिली.
लोकमत न्यूज नेटवर्क
देवळी : ग्रामपंचायत स्तरावरील कोणतेही गैरव्यवहार खपवून घेतले जाणार नाही, अशी समज विभागाचे आ. रणजीत कांबळे यांनी पंचायत समितीच्या व जिल्ह्यातील संबंधित पाणीपुरवठा अधिकाऱ्यांना दिली.
स्थानिक पंचायत समितीच्या सभागृहात आयोजित संभाव्य पाणी टंचाई कृती आराखडा बैठकीत ते बोलत होते. मंचावर पं.स. सभापती विद्या भुजाडे, उपसभापती किशोर गव्हाळकर, जि.प. सदस्य मयुरी मसराम, पं.स. सदस्य अशोक इंगळे, शंकर उईके, कल्याणी ढोक, तहसीलदार तेजस्विनी जाधव व गटविकास अधिकारी बारापात्रे यांची उपस्थिती होती.
मतदार संघातील काही गावे टंचाईग्रस्त होणार हे लक्षात घेवून अधिकाºयांनी कामाची गती वाढवावी. तसेच ग्रामपंचायतीने याबाबतचे ठराव तातडीने घेवून आतापासून नियोजन करावे, असे निर्देश आ. कांबळे यांनी अधिकारी व पदाधिकाऱ्यांना दिले.
आमचे सरकार योजनेंतर्गत ग्रा.पं. स्तरावर कार्यरत आॅपरेटरच्या कार्यपद्धतीवर आ. कांबळे यांनी ताशेरे ओढत याबाबत वरिष्ठ अधिकाºयांना फैलावर घेतले. तालुक्यात प्रत्येकी एक याप्रमाणे ६३ ग्रा.पं. मध्ये आॅपरेटर असलेच पाहिजे. कारण प्रत्येकी साडेबारा हजार याप्रमाणे ६३ आॅपरेटरचा पगार ग्रा.पं. च्या कोषातून जात आहे. परंतु प्रत्यक्षात फक्त ३७ आॅपरेटर कार्यरत आहे. उर्वरित आॅपरेटरचे पगार कुणाच्या तरी खिश्यात जात आहे, यानंतर असे जमणार नसल्याचे ते म्हणाले.
ग्रा.पं. सरपंच व पदाधिकाºयांची संबंधित पाणी पुरवठा अधिकारी दिशाभूल करतात. ग्रा.पं.कडे थकीत पाणी पुरवठ्याबाबतच्या बिलाची पुर्वसूचना न देता ६-६ महिन्याचे बील एकाचवेळेस पाठविले जाते. त्यामुळे ग्रा.पं. पदाधिकाºयांना नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागते. अशा अनेक तक्रारी सरपंचांनी आ. कांबळे यांच्या कानी घातल्या. बैठकीला तालुक्यातील सरपंच, ग्रामसेवक तसेच पाणी पुरवठ्याचे उपविभागीय अभियंता नाथे, सहा.भूवैद्यानिक डॉ. धाराशिवकर व इतर अधिकारी तथा पदाधिकारी उपस्थित होते.
काजळसरा पाणीपुरवठा विहिरीने गाठला तळ
काजळसरा येथे पाणी पुरवठ्याच्या विहिरीला फक्त ४ इंच क्षारयुक्त पाणी असल्याने आजाराचे प्रमाण वाढले आहे. ३५ वर्षांपुर्वीची ही विहीर असल्याने तीचे आयुष्य संपल्याची तक्रार करण्यात आली. लोणी येथील पाणीपुरवठा योजना सन १२-१३ ची असताना अद्याप पुर्णत्वास आली नसल्याने त्यांनी रोष व्यक्त केला.