रेल्वे उड्डाणपूल रूंदीकरण कामाची पाहणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 4, 2017 11:07 PM2017-10-04T23:07:45+5:302017-10-04T23:07:56+5:30
केंद्रीय मार्ग निधी योजनेतून बजाज चौक रेल्वे उड्डाणपुलाच्या रूंदीकरणाचे काम सुरू आहे. यातील समस्यांचे निराकरण करण्याच्या दृष्टीने खा. रामदास तडस यांनी कामाची पाहणी केली.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : केंद्रीय मार्ग निधी योजनेतून बजाज चौक रेल्वे उड्डाणपुलाच्या रूंदीकरणाचे काम सुरू आहे. यातील समस्यांचे निराकरण करण्याच्या दृष्टीने खा. रामदास तडस यांनी कामाची पाहणी केली. यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता विलास मून, शाखा अभियंता मोकलकर व मिसाळ उपस्थित होते.
केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी जिल्ह्यात आले असता त्यांनी बजाज चौक रेल्वे उड्डाणपुलाबाबत तडस यांच्याकडे चौकशी केली. यात कामाला गती देण्याच्या सूचना दिल्या. केलेल्या पाहणीत बांधकामातील अतिक्रमणाचा विषय, अप्रोच रस्त्याची लांबी वाढविणे, पुलावर अद्यावत स्वयंचलित हायमास्ट लाईट बसविणे, जुन्या पुलाची डागडुजी करणे, इतर तांत्रिक मुद्यांवर चर्चा करण्यात आली. २०१४ नंतर केंद्रीय मंत्री गडकरी यांनी विशेष बाब म्हणून या कामाला मंजुरी दिल्याने केंद्राच्या माध्यमातून हे काम होणार आहे, असे मत खा. तडस यांनी व्यक्त केले. यानंतर जिल्हाधिकाºयांशी संपर्क साधत बजाज चौक रेल्वे उड्डाणपुलात येणाºया अडचणी दूर करण्यासाठी सर्व शासकीय यंत्रणांना माहिती देऊन आढावा बैठक घेण्याच्या सूचनाही देण्यात आल्यात.