राष्ट्र सेवादलाची ‘चला भारतीय बनू या’ प्रबोधन मोहीम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 4, 2018 23:38 IST2018-02-04T23:38:16+5:302018-02-04T23:38:50+5:30
राष्ट्रसेवा दल जिल्हा शाखेच्या वतीने विद्यार्थ्यांमध्ये देशाभिमान जागृत करण्यासाठी तथा जात, धर्माच्या पलीकडे जाऊन मी प्रथम भारतीय आहो, ही भावना रूजविण्यासाठी ‘चला भारतीय बनू या’ ही मोहिम सुरू करण्यात आली.

राष्ट्र सेवादलाची ‘चला भारतीय बनू या’ प्रबोधन मोहीम
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : राष्ट्रसेवा दल जिल्हा शाखेच्या वतीने विद्यार्थ्यांमध्ये देशाभिमान जागृत करण्यासाठी तथा जात, धर्माच्या पलीकडे जाऊन मी प्रथम भारतीय आहो, ही भावना रूजविण्यासाठी ‘चला भारतीय बनू या’ ही मोहिम सुरू करण्यात आली. यात जगजीवनराम माध्यमिक विद्यालय व न्यू कमला नेहरू माध्यमिक विद्यालय या शाळेत प्रबोधन तथा गीतांचा कार्यक्रम घेत मोहिमेची सुरूवात करण्यात आली.
कार्यक्रमाला राष्ट्रसेवा दलाचे माजी राज्य कार्याध्यक्ष राजा अवसक, माजी पूर्व विदर्भ प्रमुख गजेंद्र सुरकार, जगजीवनराम शाळा संस्थेचे सचिव माजी शिक्षणाधिकारी लक्ष्मीकांत सोनवणे, प्राचार्य डॉ. अनिल गावंडे, जगजीवनराम अध्यापक विद्यालयाचे मुख्याध्यापक रमेश निमसडकर, राष्ट्रसेवा दलाचे राष्ट्रीय संघटक सदाशिव मगदूम सांगली, माजी राष्ट्रीय महासचिव बाबा नदाफ कोल्हापूर, मुख्याध्यापिका महल्ले आदी उपस्थित होते. राष्ट्र सेवा दल ही देशाभिमान, धर्म निरपेक्षता, विज्ञाननिष्ठता, राष्ट्रवाद, समाजवाद, लोकशाही या मूल्यांवर काम करून मूल्याधिष्ठित समाज व्यवस्था निर्माण करणारी संघटना आहे. लहान वयातच विद्यार्थ्यांमध्ये या मूल्यांची रूजवात व्हावी म्हणून ही प्रबोधन मोहीम आहे, असे सांगण्यात आले. प्रास्ताविक गजेंद्र सुरकार यांनी केले. संचालन मसराम व प्रा. अजय सावरकर यांनी केले तर आभार उईके यांनी मानले.