संत गाडगेबाबा यांची पालखी आज जिल्ह्यात

By Admin | Published: November 12, 2016 01:15 AM2016-11-12T01:15:42+5:302016-11-12T01:15:42+5:30

संत गाडगेबाबांचा स्वच्छतेचा संदेश राज्यातील अनेक गावांमध्ये पोहचण्याकरिता महाराष्ट्र शासनाच्या वतीने

Sant Gadgebaba's palanquin is in the district today | संत गाडगेबाबा यांची पालखी आज जिल्ह्यात

संत गाडगेबाबा यांची पालखी आज जिल्ह्यात

googlenewsNext

स्वच्छता मिशन : २५ गावांत करणार जागर
वर्धा : संत गाडगेबाबांचा स्वच्छतेचा संदेश राज्यातील अनेक गावांमध्ये पोहचण्याकरिता महाराष्ट्र शासनाच्या वतीने काढण्यात आलेल्या संत गाडगेबाबा पालखीचे आगमन जिल्ह्यात शनिवारी सेलू तालुक्यातील हिंगणी येथे होणार आहे. सदर पालखी १२ व १३ नोव्हेंबर अशी दोन दिवस जिल्ह्यातील सेलू, वर्धा, समुद्रपूर, हिंगणघाट व देवळी तालुक्यातील अनेक गावांमधून मार्गक्रमण करणार आहे. स्वच्छ भारत मिशनच्यावतीने पालखीच्या आगमनाची तयारी करण्यात आली आहे.
स्वच्छतेचे प्रणेते संत गाडगेबाबा यांनी ज्या गाडीमधून जागोजागी अनेक गावांमध्ये जाऊन प्रबोधन केले, जनतेला स्वच्छतेचे महत्व पटवून सांगितले, त्या गाडीचे पालखीत रूपांतर केले आहे. शासनाने २ आॅक्टोबरला महात्मा गांधी यांच्या जयंतीचे औचित्य साधून स्वच्छता अभियानाचा एक उपक्रम म्हणून राज्यात २ आॅक्टोबर ते ३० नोव्हेंबर या कालावधीत स्वच्छता पालखी कार्यक्रम राबविण्याचा निर्णय घेतला आहे.
सदर पालखी राज्यातील अनेक जिल्ह्यामधून मार्गक्रमण करीत आहे. नागपूर जिल्ह्यातून या पालखीचे वर्धा जिल्ह्यातील ग्रामपंचायत हिंगणी येथे आगमन होत आहे. हिंगणी येथून ही पालखी मोई, घोराड, जयपूर, खडका, चानकी (कोपरा), हमदापूर आदी गावामधून समुद्रपूर, वर्धा, हिंगणघाट, देवळी तालुक्यातील गावांमधून मार्र्गक्रमण करीत यवतमाळ जिल्ह्यात दाखल जाणार होईल, अशी माहिती विभागाने दिली.(जिल्हा प्रतिनिधी)

Web Title: Sant Gadgebaba's palanquin is in the district today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.