भ्रमणध्वनी लोक अदालतच्या फिरत्या विधी सेवेला प्रारंभ
By Admin | Published: July 3, 2016 02:10 AM2016-07-03T02:10:11+5:302016-07-03T02:10:11+5:30
महाराष्ट्र राज्य सेवा प्राधिकरण मुंबई तथा विधी सेवा उपसमिती उच्च न्यायालय नागपूर आणि जिल्हा विधी सेववा प्राधिकरण वर्धा यांच्या संयुक्त विद्यमाने
न्यायासाठी उपक्रम : ३० दिवस शिबिर
वर्धा : महाराष्ट्र राज्य सेवा प्राधिकरण मुंबई तथा विधी सेवा उपसमिती उच्च न्यायालय नागपूर आणि जिल्हा विधी सेववा प्राधिकरण वर्धा यांच्या संयुक्त विद्यमाने फिरते लोक अदालत आणि विधी सेवा शिबिर १ ते ३१ जुलै दरम्यान घेण्यात येत आहे. शुक्रवारी या शिबिराला जिल्हा विधी सेवा प्राधिकरणच्या अध्यक्ष तथा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश संध्या रायकर यांच्या हस्ते प्रारंभ करण्यात आला.
शासनाच्या फिरते लोक अदालत आणि विधी सेवा शिबिरांतर्गत पक्षकारांना न्याय त्यांच्या दारात मोबाईलव्हॅन उपलब्ध करून देण्यात आली आहे. मोबाईल व्हॅन जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात जाणार आहे. यात आर्वी १ ते ४ जुलै, आष्टी ५ ते ८ जुलै, कारंजा (घा.) ९ ते ११ जुलै, वर्धा १२ ते १५ जुलै, सेलू १६ ते १९ जुलै, पुलगाव २० ते २३ जुलै, हिंगणघाट २४ ते २७ जुलै, समुद्रपूर २८ ते ३१ जुलैपर्यंत मोबाईल व्हॅनद्वारे लोक अदालत शिबिर घेण्यात येणार आहे. या शिबिरात अधिकाधिक पक्षकारांनी आपली प्रकरणे आपसी तडाजोडीने निकाली लावून घेत योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन न्या. रायकर यांनी केले. कार्यक्रमाला जिल्हा न्यायाधीश मु.द. चांदेकर, म.र. पुरवार, स.वि. खोंगले, अं.शे. खडसे, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे सदस्य सचिव तथा दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर सु.ना. राजूरकर, सर्व दिवाणी न्यायाधीश, न्यायालयीन व्यवस्थापक पिंपळे, प्रबंधक बाकडे, प्राधिकरण व जिल्हा न्यायालयातील सर्व कर्मचारी उपस्थित होते.(कार्यालय प्रतिनिधी)