महिला बचत गट निर्मितीला प्रारंभ

By admin | Published: June 10, 2017 01:28 AM2017-06-10T01:28:58+5:302017-06-10T01:28:58+5:30

महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान(उमेद) अंतर्गत जिल्ह्यातील सेलू, वर्धा, देवळी, समुद्रपूर येथे सभा घेण्यात आली.

Start of production of women saving group | महिला बचत गट निर्मितीला प्रारंभ

महिला बचत गट निर्मितीला प्रारंभ

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान(उमेद) अंतर्गत जिल्ह्यातील सेलू, वर्धा, देवळी, समुद्रपूर येथे सभा घेण्यात आली. यावेळी तालुकास्तरावर वर्धिनीचे २० पथक तयार करण्यात आले. या माध्यमातून गाव स्तरावर महिला बचत गट तयार करण्याचे काम करण्यात येत आहे.
सभेला बाह्य संसाधन व्यक्ती उपस्थित होत्या. प्रमुख मार्गदर्शक मुख्य कार्यकारी अधिकारी नयना गुंडे, प्रकल्प संचालक प्रमोद पवार, जिल्हा अभियान व्यवस्थापक देवकुमार कांबळे, जिल्हा व्यवस्थापक वर्धिनी कक्ष अमोलसिंग रोटोले, जिल्हा व्यवस्थापक सुकेशनी पाथार्डे, मनीष कावडे उपस्थित होते.
उमेद अभियानाअंतर्गत जिल्ह्यात वर्धिनी कक्ष तयार करण्यात आला आहे. जिल्ह्याबाहेर व जिल्ह्यांतर्गत वर्धिनी राउंड नियमित स्तरावर पाठविण्यात येतात. जिल्ह्यांतर्गत ३० दिवसीय फेरी पूर्ण करुन एकूण २० पथक, १८० वर्धिनीद्वारे ४० गावामध्ये एकूण ३२९ स्वयंसहायता गटाची निर्मिती करण्यात येत आहे. ग्रामस्तरावर ८० प्रेरिका, ३२९ बुककीपर निवडण्यात आले. उमेद अभियानाद्वारे गावस्तरावर स्वयंसहायता गटाची निर्मिती करुन त्यांना विविध प्रशिक्षण, बँक जोडणी, उपजीविकेच्या साधनाची उपलब्धता करुन सक्षम करणे, सुशिक्षित बेरोजगार मुलांकरिता दीनदयाळ उपाध्याय ग्रामीण कौशल्य योजनेअंतर्गत रोजगाराची संधी मिळवून देण्यात येणार आहे.
वर्धिनी आढावा बैठकीकरिता जिल्हा अभियान व्यवस्थापन कक्षद्वारे सरिता इंगोले, शालिनी आदमने, युसुफ पठाण, हेमंत सूर्यवंशी आदींनी सहकार्य केले.
 

Web Title: Start of production of women saving group

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.