अवाजवी कर आकारणी बंद करा
By admin | Published: November 30, 2015 02:04 AM2015-11-30T02:04:35+5:302015-11-30T02:04:35+5:30
नगरपालिकेने आधीच मालमत्ता कर दुपटीने वाढविले आहे. ेसामान्य माणसांना नियमित मालमत्ता कर भरणे अवघड झाले आहे.
जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन : अ.भा. महात्मा फुले समता परिषदेचे साकडे
वर्धा : नगरपालिकेने आधीच मालमत्ता कर दुपटीने वाढविले आहे. ेसामान्य माणसांना नियमित मालमत्ता कर भरणे अवघड झाले आहे. त्यामुळे ही अवाजवी कर आकारणी थांबवावी अशी मागणी अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या वतीने जिल्हाधिकारी यांना निवेदनाद्वारे करण्यात आली.
निवेदनानुसार थकीत रकमेवर नगरपालिकेने प्रतिमहा २ टक्के दराने दंड आकारणे सुरू केले आहे. म्हणजेच वार्षिक दंड २४ टक्के आहे. ही आकारणी अन्यायकारक स्वरुपाची आहे. एवढी आकारणी करून नगर विकासाच्या कामाकडे मात्र दुर्लक्ष होत असल्याचे दिसते. शहरातील साफसफाईकडे तर न. प. चे लक्षच नाही.
ही दंड आकारणी बँक व सावकारापेक्षाही जास्त आहे. त्यामुळे निवेदनाची दखल घेऊन दंड आकारणी रद्द करावी अशी मागणी करण्यात आली. तसेच या दंडआकारणीचा विनियोग कशा प्रकारे होतो याकडेही लक्ष देण्याची मागणी यावेळी करण्यात आली.
निवेदन देताना शिष्टमंडळात जिल्हा संघटक विनय डहाके, जिल्हा अध्यक्ष निळकंठ पिसे, निळकंठ राऊत, अभय पुसदकर, संजय भगत, रामदास कुबडे, पुंडलिक नागतोडे, जयंत भालेराव, प्रदीप देशकर, भरत चौधरी यासह इतरही कार्यकर्ते उपस्थित होते.(शहर प्रतिनिधी)