देशभक्ताची शौर्यगाथा युवा पिढीला कळावी
By admin | Published: August 18, 2016 12:47 AM2016-08-18T00:47:11+5:302016-08-18T00:47:11+5:30
देशासाठी हौतात्म्य पत्करणाऱ्या देशभक्तांचा युवकांना विसर पडत आहे.
रामदास तडस : तिरंगा जनसंवाद यात्रा
पुलगाव : देशासाठी हौतात्म्य पत्करणाऱ्या देशभक्तांचा युवकांना विसर पडत आहे. त्यामुळे आजच्या युवा पिढीला स्वातंत्र्य लढ्यातील शहिदांची शौर्यगाथा माहीत व्हावी, देशाच्या स्वातंत्र्यासाठी प्राणाची आहुती देणाऱ्या देशभक्तांच्या बलिदानाची ज्योत सतत त्यांच्या मनात तेवत राहावी यासाठीच ही तिरंगा जनसंवाद यात्रा असल्याचे प्रतिपादन खा. रामदास तडस यांनी केले.
पुलगाव शहरात मंगळवारी आलेल्या भाजपाच्या तिरंगा जनसंवाद यात्रेच्या स्वागत प्रसंगी ते बोलत होते. दीनदयाल चौकात आयोजित कार्यक्रमाला माजी खा. सुरेश वाघमारे, माजी जिल्हाध्यक्ष डॉ. शिरीष गोडे, जि. प. माजी शिक्षण सभापती मिलिंद भेंडे, शहराध्यक्ष मंगेश झाडे, सुनील गफाट, नितीन बडगे, संजय गाने, साबिर कुरेशी, बाळा जगताप, कपील शुक्ला उपस्थित होते. सदर तिरंगा जनसंवाद यात्रा आगरगाव, नाचनगाव मार्गे रात्री ८ वा. शहरात मुख्य मार्गाने भ्रमण करून स्व. दीनदयाल चौकात पोहचल्यावर यात्रेचे स्वागत करण्यात आले. २०० मोटर सायकलचा ताफा यात्रेत सहभागी होता.
प्रास्ताविक मंगेश झाडे यांनी केले. नगरसेविका रंजना कडू, माधुरी इंगळे, दुर्गा व्यास, आशिष गांधी, मधुकर रेवतकर, सुरेश सुखिजा यावेळी उपस्थिती होते. १७ आॅगस्टला सकाळी गुंजखेडा मार्गे यात्रेने प्रस्थान केले. संचालन अविनाश भोपे तर आभार दुबे यांनी मानले.(तालुका प्रतिनिधी)