३२ एसटी बसेस, २ बोटींसह १२० वाहनांचा वापर

By ऑनलाइन लोकमत | Published: October 21, 2019 12:51 AM2019-10-21T00:51:49+5:302019-10-21T00:51:53+5:30

बोईसर मतदारसंघातील वाहनव्यवस्था

32 ST buses, 2 Boats with 120 vehicles used | ३२ एसटी बसेस, २ बोटींसह १२० वाहनांचा वापर

३२ एसटी बसेस, २ बोटींसह १२० वाहनांचा वापर

Next

- पंकज राऊत

बोईसर : मतदानासाठी रविवार आणि सोमवार असे सलग दोन दिवस एसटीच्या ३२ बसेस आणि २ बोटींसह एकूण १२० विविध वाहनांचा बोईसर मतदारसंघात वापर करण्यात येणार आहे. निवडणुकीच्या माध्यमातून एसटीला मोठ्या प्रमाणात महसूल मिळणार असून एवढ्या मोठ्या प्रमाणात बसेस निवडणुकीच्या कामासाठी देण्यात आल्याने नियमित फेऱ्या रद्द करणार असल्याने ग्रामीण भागातील प्रवाशांना त्रास सहन करावा लागणार आहे.

निवडणूक निर्णय अधिकारी विकास गजरे आणि सहाय्यक निवडणूक अधिकारी डॉ. स्वाती घोंगडे यांच्या अधिपत्याखाली तारापूर एमआयडीसीतील टिमा कार्यालयात महिन्याभरापासून कार्यालय सुरू करण्यात आले असून बोईसर विधानसभा मतदार संघातील यंत्रणेची विविध कामे, प्रशिक्षण, नियोजन, आखणी आणि अंमलबजावणी येथूनच सुरू आहे.

या निवडणूक प्रक्रियेसाठी दोन दिवस एसटीच्या ३२ आणि २ खाजगी अशा एकूण ३४ बसेसचा वापर होणार असून यापैकी २५ बसेस बोईसर डेपोच्या तर ७ बसेस नालासोपारा डेपोतून मागवण्यात आल्या आहेत. या बरोबरच १४ मिनी बस, २० जीप, ४६ झोनलसाठी जीप, ४ ट्रक, तर २ बोटींचा वापर करण्यात येणार आहे. या पैकी ४ जीप, मॅजिक आणि १ बोट राखीव ठेवण्यात येणार आहे. या मधील ४८ झोनच्या वाहनांना जीपीएस यंत्रणाही बसविण्यात आल्या आहेत. निवडणूक साहित्याबरोबरच निवडणूक प्रक्रियेतील कर्मचाऱ्यांना नियोजित मतदानाच्या स्थळी पोहोचवण्यासाठी तसेच सोमवारी मतदान प्रक्रिया आटोपल्यानंतर मतदान यंत्र बोईसर निवडणूक निर्णय अधिकाºयांच्या कार्यालयात आणण्यासाठी या सर्व यंत्रणेचा वापर करण्यात येणार आहे.

काही महिन्यांपूर्वी लोकसभा निवडणुकीतही एसटीच्या बसेसचा वापर करण्यात आला होता. त्यावेळी निवडणुकीच्या माध्यमातून एसटीला लाखो रु पयांचा महसूल मिळाला होता. सोमवारी होणाºया मतदानासाठी देखील सलग दोन दिवस बारा-बारा तासांसाठी बोईसर एसटी डेपोतून निवडणूक प्रक्रियेसाठी बसेस देण्यात येणार आहेत. यामुळे स्थानिक फेºयांवर परिणाम होऊन एसटीच्या नेहमीच्या फेºया कमी होणार आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातल्या प्रवाशांना मानसिक त्रास सहन करावा लागणार आहे.

Web Title: 32 ST buses, 2 Boats with 120 vehicles used

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.