पर्ससीननेट बंदीबाबतच्या बैठकीत हाणामारी

By admin | Published: October 17, 2015 11:30 PM2015-10-17T23:30:32+5:302015-10-17T23:30:32+5:30

पर्ससीन नेट मासेमारीमुळे समुद्रातील जैवविविधतेसह मत्स्यसंपदा संपुष्टात येत असल्याने मत्स्य व्यवसायासाठी विनाशकारी ठरलेली ही मासेमारी कायमस्वरुपी बंद करावी असा ठराव

Action meeting in Persecenate ban | पर्ससीननेट बंदीबाबतच्या बैठकीत हाणामारी

पर्ससीननेट बंदीबाबतच्या बैठकीत हाणामारी

Next

- हितेन नाईक,  पालघर
पर्ससीन नेट मासेमारीमुळे समुद्रातील जैवविविधतेसह मत्स्यसंपदा संपुष्टात येत असल्याने मत्स्य व्यवसायासाठी विनाशकारी ठरलेली ही मासेमारी कायमस्वरुपी बंद करावी असा ठराव बहुमताने महाराष्ट्र व गुजरात राज्यातील मच्छिमारांच्या प्रतिनिधीच्या बैठकीत मांडला जात असताना मूठभर पर्ससीन नेट धारकांनी याला विरोध दर्शवीत हाणामारीला सुरुवात केली. पोलिसांनी या प्रकरणी काही पर्ससीन धारकांना ताब्यात घेतल्याची माहिती महाराष्ट्र मच्छिमार कृती समितीचे चिटणीस रामकृष्ण तांडेल यांनी दिली.
समुद्रात ज्या पद्धतीने अपरीमीत मासेमारी सुरु आहे. ते पाहता सन २०२६ पर्यंत समुद्रामध्ये एकही मासा शिल्लक राहणार नसल्याचा इशारा सागरी मत्स्य संशोधन केंद्रातील शास्त्रज्ञांनी दिला आहे. समुद्रातील जैवविविधता व मत्स्यसंपदा संपुष्टात आणण्यासाठी ट्रॉलर्स व पर्ससीन नेटद्वारे करण्यात येणारी अमर्याद मासेमारी मुख्यत्वे कारणीभूत असल्याचा अहवालही त्यांनी शासनाकडे दिला आहे. अशावेळी ती वाचवून त्याचा समतोल राखण्याच्या दृष्टीने मर्ससीन नेटधारकावर अंकुश लावण्याऐवजी राज्य व केंद्रशासन एनसीडीसी योजनेंतर्गत या नौकाधारकांना अनुदान तत्वावर कर्ज कर्ज देऊन त्यांना उत्तेजन देत असल्याचा आरोप मच्छिमारांकडून करण्यात येत आहे. त्यामुळे पर्ससीन नेटधारक मालकांकडे आज ८ ते १० ट्रॉलर्स आहेत.
विनाशकारी पर्ससीन धारकांवर अंकुश ठेवून त्याद्वारे होणारी मासेमारी पूर्णत: बंद करावी यासाठी आज दमण येथे अखिल गुजरात मच्छिमार महामंडळ यांनी गुजरात राज्यातील जाफराबाद, दिव, दमण, मँगलोर, नवाबंदर, वेरावळ, उमरसाड, झाई येथील मच्छिमार प्रतिनिधी व पालघर, ठाणे, मुंबई येथील मच्छिमार प्रतिनिधी यांची बैठक आयोजित केली होती.
यावेळी गुजरातचे माजी खासदार गोपालभाई टंडेल, भागुभाई सोलंकी, मच्छिमार कृतीसमितीचे सरचिटणीस नरेंद्र पाटील, रामकृष्ण तांडेल, जिल्हाध्यक्ष राजन मेहेर, मुंबई जिल्हाध्यक्ष किरण कोळी, जयप्रकाश मेहेर, सुरेश म्हात्रे, गणेश तांडे आदी मान्यवरांसह मोठ्या संख्येने प्रतिनिधी उपस्थित होते. यामुळे पारंपारीक पद्धतीने मच्छिमारी करणाऱ्या बांधवात संताप धुमसतो आहे.

Web Title: Action meeting in Persecenate ban

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.