शेंदुराचे देवही मिशन स्वच्छतेत अपयशी, आरोग्याचा प्रश्न बिकट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 7, 2017 12:39 AM2017-10-07T00:39:01+5:302017-10-07T00:39:16+5:30
सातपाटी गावातील अस्वच्छतेला लगाम लावण्यासाठी ग्रामपंचायतींनी शेंदूर फासून निर्माण केलेले देव ही गावातील अस्वच्छता रोखण्यास अपयशी ठरले
पालघर: सातपाटी गावातील अस्वच्छतेला लगाम लावण्यासाठी ग्रामपंचायतींनी शेंदूर फासून निर्माण केलेले देव ही गावातील अस्वच्छता रोखण्यास अपयशी ठरले असून काही ग्रामस्थ नवनवीन ठिकाणे शोधून आपला कचरा रस्त्याच्या कडेला फेकुन बेपर्वाईचे दर्शन घडवीत आहेत.
तालुक्यातील सातपाटी हे लोकसंख्येच्या मानाने सर्वात मोठे गाव म्हणून ओळखले जात असून २०११ च्या जनगणने नुसार १७ हजार ३२ इतकी लोकसंख्या कागदोपत्री असली तरी मासेमारी ह्या प्रमुख व्यवसायाशी निगिडत असलेले शेकडो लोक रहात असल्याने सुमारे ३० ते ३५ हजाराच्या वर लोकसंख्या पोहोचली आहे. त्यामुळे ग्रामपंचायतीवर सोयीसुविधा पुरविण्या बाबत मोठी कसरत करावी लागत आहे.
सातपाटी गावातून निर्माण होणारा कचरा गोळा करून तो सध्या गावाच्या बाहेरील समुद्र किनारी असलेल्या स्मशानभूमीजवळ टाकला जात असल्याने तोच कचरा भरतीने पुन्हा समुद्रात जाऊन समुद्राचे प्रदूषण होत मच्छीमारांच्या जाळा मध्ये अडकला जात आहे. तर दुसरीकडे गावात (ओहोळीत) निर्माण झालेल्या डिम्पंग ग्राउंडवर टाकलेला कचरा जाळला जात असल्याने नागरिकांच्या आरोग्यावर दूरगामी परिणाम होत आहेत. हा कचरा गावा बाहेर डिम्पंग ग्राउंड बनवून तिथे टाकण्यासाठी साठी जागा मिळावी हा ग्रामपंचायतीचा जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठविलेला प्रस्ताव परत आल्याने ग्रामपंचायती पुढे कचºयाचे संकट उभे राहिले आहे. मात्र नियोजित डिम्पंग ग्राउंडच्या जागेत होणाºया बेकायदेशीर अतिक्र मणाकडे मात्र महसूल आणि वन विभागाचे अर्थपूर्ण दुर्लक्ष होत असल्याचा आरोप केला जात आहे. यावर उपाय म्हणून शेंदूराची दगडे ठेऊनही लोकांना भीती वाटन नसून कचरा टाकण्याचे प्रकार सुरुच आहेत.