समुद्री कासवांच्या मृत्यूचे प्रमाण वाढले

By admin | Published: April 12, 2017 01:44 AM2017-04-12T01:44:52+5:302017-04-12T01:44:52+5:30

वसईच्या अर्नाळा आणि भुईगाव समुद्रकिनारी समुद्री कासवे मरून पडू लागली आहेत. महिनाभरात किमान दहाहून अधिक कासवांचा मृत्यू झाल्याने चिंता व्यक्त केली जात आहे.

The death rate of marine turtles increased | समुद्री कासवांच्या मृत्यूचे प्रमाण वाढले

समुद्री कासवांच्या मृत्यूचे प्रमाण वाढले

Next

वसई : वसईच्या अर्नाळा आणि भुईगाव समुद्रकिनारी समुद्री कासवे मरून पडू लागली आहेत. महिनाभरात किमान दहाहून अधिक कासवांचा मृत्यू झाल्याने चिंता व्यक्त केली जात आहे.
वसईच्या समुद्रकिनारी समुद्र कासवांची मोठ्या प्रमाणावर पैदास होत आहे. अर्नाळा समुद्रकिनारी महिनाभरात किमान पाच ते सात कासवे मृत्युमुखी पडल्याची माहिती येथील बागायतदार फ्रेडी बरबोज यांनी दिली. याच पद्धतीने गेल्या काही महिन्यांपासून भुईगाव समुद्रकिनारीही समुद्री कासवे मरून पडत आहेत, असेही बरबोज यांनी सांगितले. समुद्रातील पाणी प्रदूषित होत असल्यानेच कासवे मृत्युमुखी पडत असावीत, असे स्थानिकांकडून सांगितले जाते आहे. (प्रतिनिधी)

Web Title: The death rate of marine turtles increased

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.