विहीर योजनेच्या मंजुरीचे प्रस्ताव धूळखात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 6, 2017 11:41 PM2017-11-06T23:41:31+5:302017-11-06T23:41:50+5:30
शासनाने कार्यान्वित केलेली एखादी योजना शेतकºयांच्या कितीही फायद्याची असो परंतु स्थानिक प्रशासनाची इच्छा शक्ती नसेल तर त्या योजनेची कशी वाट लागते याचा प्रत्यय तालुक्यातील आदिवासी
रविंद्र साळवे
मोखाडा : शासनाने कार्यान्वित केलेली एखादी योजना शेतकºयांच्या कितीही फायद्याची असो परंतु स्थानिक प्रशासनाची इच्छा शक्ती नसेल तर त्या योजनेची कशी वाट लागते याचा प्रत्यय तालुक्यातील आदिवासी शेतक-यांना आला आहे
तालुक्यातील २७ ग्रामपंचायती मधील हिरवे १६ बेरिस्ते १० खोच १० साखरी १ दाडवळ १ गोमघर १ गोंदेखुर्द १ पोशेरा ६ कोशिमशेत १ मोरहंडा १ आडोशी ३ वाशाळा ४ उधळे ८ सातुर्ली १ किनिस्ते १ अशा ७८ गरजू शेतकº्यांनी महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेच्या वयक्तिक लाभाच्या सिंचन विहीर योजनेसाठी मोखाडा पंचायत समितीच्या रोजगार हमी विभागाकडे देण्यात आलेले प्रस्ताव पाणी पुरवठा विभागाच्या अनावस्थेमुळे तांत्रिक मंजुरी अभावी धूळखात पडले आहेत. यामुळे तीव्र नाराजी येथील शेतकºयांकडून व्यक्त केली जात आहे. या सिंचन विहीर योजनेसाठी ३ लाखांचा अनुदानीत निधी दिला जात असून आदिवासी शेतकºयाना प्यायला पाणी मिळावे शेतीला पाणी उपलब्ध व्हावे त्यांचा आर्थिक स्थर उंचवावा या उद्देशाने सुरु केलेली व शेतकºयांच्या दृष्टीने महत्वाची असलेली सिंचन योजना स्थानिक प्रशासनने बासनात गुंढाळलेली आहे.
अशी आहे योजना..! : पंचायत समितीच्या रोजगार हमी विभागाकडून आलेले लाभार्थ्यांच्या प्रस्तावाला तांत्रिक मंजुरी देऊन हा प्रस्ताव भूवैज्ञानिक विभागाकडे पाठवले जातात यानंतर ते घटनास्थळी येऊन विहिरीच्या जागेवर पाणी लागेल कि नाही याची खात्री केली जाते. यानंतर प्रशाकीय मान्यता देण्यात येते.
सन २०११-१२ पासून सिंचन विहिरीला ग्रहण
शेतकºयांच्या दुरु ष्टीने फायद्याची असलेल्या सिंचन विहीर योजनेला तालुक्यात सन २०११-१२ मध्ये चार कोटी ३० लाखांचे अनुदान उपलब्ध करून देण्यात आले होते परंतु सरकारी बांबूच्या भोंगळ कारभारामुळे अनेक वयक्तीक लाभाच्या विहिरी अपूर्णच राहिल्या व चुकीच्या पद्धतीने लाभार्थ्यांची निवड केल्याने मोठ्या प्रमाणात अनुदान परत गेले अधिकार्यांच्या इच्छा शक्तीच्या अभावामुळे चार कोटीच्या अनुदानाचे तालुक्यात वाटोळे लावले. यानंतर अपूर्ण विहिरी पूर्ण झाल्यावरच नवीन लाभार्थ्यांना लाभ दिला जाईल असा फतवा मोखाडा पंचायत समितीने काढला यानंतर गेल्या तीन चार वर्षा पासून पेंडिंग असलेल्या प्रस्तावना मुहूर्त मिळाला खरा, परंतु पाणी पुरवठा विभागाच्या दुर्र्लिक्षत कारभारामुळे तांत्रिक मंजुरीला आलेलेले प्रस्ताव धूळखात पडले असल्याने तालुक्यातील शेतकºयांची प्रतीक्षा कायम आहे.
आम्ही वयक्तीक लाभाच्या व सार्वजनिक सिंचन विहिरीचे इिस्टमेट तयार करून पंचायत समतिीकडे पाठवले आहेत
-एस एस खाद्री ,
पाणी पुरवठा, शाखा अभियंता,मोखाडागेल्या दोन वर्षां पूर्वी आम्ही विहीर योजनेसाठी प्रस्ताव पंचायत समतिीकडे दिला आहे परंतु अद्यापही आमची विहीर मंजूर झालेली नाही
- बच्चीबाई लचके, वंचित लाभार्थी, पळसपाडा