भगवान महावीर जयंतीस पालघरला जैन एकता महाकुंभ
By admin | Published: April 10, 2017 05:23 AM2017-04-10T05:23:32+5:302017-04-10T05:23:32+5:30
भगवान महावीरांच्या जयंतीचे औचित्य साधून जैनाचार्य विमलसागरसुरी महाराज यांच्या प्रेरणेने पालघर येथे प्रथमच
पालघर : भगवान महावीरांच्या जयंतीचे औचित्य साधून जैनाचार्य विमलसागरसुरी महाराज यांच्या प्रेरणेने पालघर येथे प्रथमच जैन एकता महाकुंभाचे आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्यात परिसरातील २२ गावांतील पाच हजारांहून अधिक जैनबांधव सहभागी झाले होते.
शहरात भगवान महावीरांच्या रथयात्रेचे व मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले होते. पालघरच्या जैन मंदिरापासून सकाळी मिरवणुकीला सुरुवात झाली. जुने पालघर, मनोर रोड, रेल्वे स्टेशन, हुतात्मा स्तंभ ते लायन्स क्लबपर्यंत सर्व बांधव भगवान महावीरांचा जयघोष करीत होते.
मिरवणुकीत जिल्ह्यातील जैन बंधूभगिनी, तरुणवर्ग हजारोंच्या संख्येने सहभागी झाले होते. त्याचप्रमाणे गुजरात, मुंबईसह राज्यातील विविध भागांतून आलेले जैनबांधवही सहभागी झाले होते. या वेळी जैनाचार्य विमलसागरसुरी यांनी प्रवचनातून उपस्थितांना भगवान महावीरांच्या अहिंसा, शाकाहार, अनेकान्तवाद, परोपकार अशा उपदेश आदी विचारांचे मार्गदर्शन केले. तसेच जयंतीनिमित्त पालघर शहरात बुंदीची १० हजारांहून अधिक पाकिटे वितरित करण्यात आली.
या कार्यक्र मात श्री जैन श्वेतांबर मूर्तिपूजक संघ, श्री वर्धमान स्थानकवासी जैन श्रावक संघ, श्री तेरापंथ धर्मसंघ, श्री दिगंबर जैन संघ आदी संघ अत्यंत उत्साहाने सहभागी झाले होते. (वार्ताहर)