जव्हार : आॅस्ट्रेलियाच्या दाम्पत्याकडून मोकाशीपाड्याला नळपाणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2018 02:01 AM2018-01-08T02:01:31+5:302018-01-08T02:01:47+5:30
आपल्या माता पित्याच्या स्मरणार्थ तालुक्यातील मोकाशी पाडा येथील पाण्याचा प्रश्न सोडविण्यात आल्याचे पुण्य आॅस्ट्रेलिया येथील अनिवासी भारतीय मुरलीधर कुमार व वंदना कुमार यांच्या पदरी पडले आहे.
हुसेन मेमन
जव्हार : आपल्या माता पित्याच्या स्मरणार्थ तालुक्यातील मोकाशी पाडा येथील पाण्याचा प्रश्न सोडविण्यात आल्याचे पुण्य आॅस्ट्रेलिया येथील अनिवासी भारतीय मुरलीधर कुमार व वंदना कुमार यांच्या पदरी पडले आहे. ६८ कुटुंब असलेल्या येथील लोकवस्तीला दरवर्षी उन्हाळ्यात पाणी टंचाईच्या झला लागायचा याची माहिती घेऊन स्वनिधीतुन तब्बल साडे आठ लाख खर्च करुन त्यांनी गावकºयांच्या चेहºयावर हसू फुलवले आहे.
यामागे दानपुण्याचा भाव असला तरी लोकांच्या समस्येवर त्यांनी काम केल्याने दानशुरांना त्यांनी एक वस्तूपाठ घालून दिला आहे. रविवारी सारसून मोकाशिपाड्यात जलव्यवस्थापण व लोकापर्ण सोहळ्याचे उद्घाटन या आॅस्ट्रेलियातील एनआरआय दांम्पत्यांकडून करण्यात आले.
ही नळपाणी पुरवठा पेयजल योजनेसाठी त्यांनी पैसेच खर्च केले असे नसून गावाच्या भौगोलिक स्थितीचा अभ्यास करुन नळपाणी योजना तयार केली हे विशेष. यामध्ये मोकाशीपाड्यात ९ स्टँड पोस्ट बसविण्यात आले आहेत. तर ११ हजार लीटरची टाकी बांधण्यात आली आहे. त्यामुळे आॅस्ट्रेलियाच्या दांम्पत्यांच्या मद्दतीने मोकाशिपाड्याची पिण्याच्या पाण्याची वणवण संपली आहे.
जव्हार तालुक्यातील सारसून मोकाशीपाड्यात फेब्रुवारी महिन्यापासूनच पाणी टंचाईला सुरवात व्हायची, तसेच एप्रिल, मे महिन्यात तर भीषण पाणी टंचाई निर्माण व्हायची, मात्र आॅस्ट्रेलियाच्या दांम्पत्यांच्या मद्दतीने मोकाशीपाड्यातील महिलांची पाण्यासाठीची वणवण अखेर संपली आहे. आता या आदिवासीपाड्यात घराघरात नळाचे पाणी यायला सुरवात झाली आहे. येथील नागरिकांच्या म्हणी नुसार, सरकारी योजना मिळेल तेव्हा मिळेल मात्र आम्हाला आॅस्ट्रेलियाच्या दांम्पत्यां दानशूर कुटुंबाकडून मुबलक पाणी मिळाले आहे. महिलांमध्ये हा आनंद येवढा मोठा होता की, त्यांनी या कुटुंबाचे स्वागत तारपानाच करून केले.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून आदिवासी आघाडीचे अध्यक्ष हरीचंद्र भोये, श्रीधर कोचरेकर, जि. प.सदस्य सुरेखा थेतल आदी उपस्थित होते.